मुंबई : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणी (Tunisha Sharma Suiccide Case) मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी शिझान खानने (Sheezan Khan) जामीनासाठी वसई न्यायालयाकडे अर्ज करण्यात केला आहे. 31 डिसेंबरला शिझानला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
[read_also content=”‘अखेर सत्य बाहेर येतयं…सुशांतच्या मृतदेहाचा VIDEO ट्विट करत नितेश राणेंचा ‘यानां’ टोला https://www.navarashtra.com/maharashtra/nitesh-rane-tweeted-video-and-claimed-that-rupkumar-shaha-was-carrying-sushant-singh-rajput-deadbody-nrps-358589.html”]
तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर तुनिषाच्या आईने शिझान खानवर अनेक आरोप केले. तसेच त्याची आईही माझ्या मुलीला त्रास देत होती. अस त्या म्हणाल्या होत्या. शिझानने तिला लग्नाचं वचन दिलं होतं . पण त्यासाठी तो तिच्यावर धर्म बदलण्याची जबरदस्ती करत होता असाही आरोप त्यांनी केला.
तुनिषा शर्माच्या आईने शिझान खानला तिच्या मुत्यूसाठी जबाबदार ठरवले. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्यानंतर त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आलं. वसई न्यायालयाने 31 डिसेंबर रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आता शिझानच्या जामीनासाठी वसई न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आहे. वसईनजिकच्या नायगावमध्ये अलिबाबा… दास्तान-ए-काबुल या मालिकेचं शूटिंग सुरु असताना अभिनेत्री तुनिषा शर्मानं आत्महत्या केली होती. तुनिशा आणि शिजान हे या मालिकेत मुख्य भूमिकेत एकत्र काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा एक व्हिडीओ तुनिशानं आत्महत्येच्या काही वेळ आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळं सेटवरच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसह तुनिषाच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. तुनिषानं गळफास घेतल्याचं लक्षात येताच, तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.