Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर

सर्व जखमींना तातडीने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यातील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर त्यांना हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 17, 2026 | 09:43 AM
किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर

किरकोळ हाणामारीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकाचा गोळीबार; एकाचा मृत्यू तर चौघे गंभीर

Follow Us
Follow Us:

हिंगोली : कळमनुरी येथील बसस्थानक परिसरात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन गटांत किरकोळ हाणामारी झाली. त्यानंतर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, चारजण गंभीर जखमी झाले आहेत. लुकमान सिद्दीकी (वय ३८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक फयुम नाईक, किशोर भालेराव तसेच एका महिला नगरसेविकेच्या पतीसह एकूण १६ जणांविरोधात कळमनुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरी शहरातील इंदिरानगर आणि पठाण मोहल्ला भागातील काही तरुणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दोन्ही गट बसस्थानक परिसरात आमने-सामने आले. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी किरकोळ हाणामारी झाली. मात्र, वाद विकोपाला गेल्याने एका गटातील तरुणांच्या टोळक्याने गावठी कट्टा काढून थेट गोळीबार केला. या गोळीबारात लुकमान सिद्दीकी यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओसामा सिद्दीकी, सारिया सिद्दीकी, इम्रान पठाण आणि मेहराज सिद्दीकी हे चारजण गंभीर जखमी झाले आहेत.

Love Affair Murder : प्यार दीवाना…की रक्तरंजित वेड? NCRB च्या आकडेवारीतून भारतात ‘क्राईम ऑफ पॅशन’चे धक्कादायक वास्तव समोर

दरम्यान, सर्व जखमींना तातडीने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यातील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर त्यांना हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेनंतर रात्रीच पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रनात आणण्याचा प्रयत्न केला.

भाजप कार्यकर्त्यावर भरदिवसा गोळीबार

दुसरीकडे, कोल्हापुरातही भाजप कार्यकर्त्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात भाजप कार्यकर्ता सुरज साखरे गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारामागे खासगी सावकारीचा वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून जीवघेण्या हल्ल्यात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसानी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

Mumbai Crime : बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या ! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात

Web Title: Shiv sena corporator opens fire one dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • crime news
  • Hingoli Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?
1

Kolhapur Firing Case: कोल्हापुर हादरलं! दिवसाढवळ्या भर चौकात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…
2

मुलीला मारल्याचा जाब विचारल्यामुळे आईची हत्या; विटेने मारहाण केली अन्…

रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने…
3

रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने…

धक्कादायक ! गुप्तधनाच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याचा नरबळी; आरोपीच्या मुलानेही दिली साथ
4

धक्कादायक ! गुप्तधनाच्या हव्यासापोटी व्यापाऱ्याचा नरबळी; आरोपीच्या मुलानेही दिली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.