Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ पोलिसांचे मुख्य आरोपीला शेकडो कॉल्स! विषारी दारू कांडप्रकरणी चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीणमधील त्या निलंबित चार पोलिसांचे मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीला शेकडो कॉल्स झाले असल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 06, 2026 | 11:50 AM
'त्या' पोलिसांचे मुख्य आरोपीला शेकडो कॉल्स! विषारी दारू कांडप्रकरणी चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

'त्या' पोलिसांचे मुख्य आरोपीला शेकडो कॉल्स! विषारी दारू कांडप्रकरणी चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

Follow Us
Follow Us:

पुणे : फुगेवाडी, हडपसर तसेच काळेपडळ परिसरात विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीणमधील त्या निलंबित चार पोलिसांचे मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीला शेकडो कॉल्स झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता प्रजापतीच्या अवैध व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते का, अथवा पोलिसांचाच छुपा पाठिंबा होता का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू पिल्याने २२ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान उरुळी कांचन येथील राधेश्याम हरीराम प्रजापती याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांशी असलेले संबंध उघडकीस आले आहेत. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यातील अजित काळे व सुमित वाघ तसेच यवत पोलिस ठाण्यातील रामदास जगताप व सुभाष डोईफोडे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण झाले. त्यात प्रजापतीशी वारंवार संभाषण झाल्याचे निष्पन्न झाले.

या संभाषणांचे स्वरूप काय होते, त्यामागे कोणते हितसंबंध होते व अवैध दारू व्यवसायाला संरक्षण दिले जात होते का, याचा आता तपास सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असून आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. विषारी दारू मृत्यूकांडातील जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच पोलिस आणि आरोपी यांच्यातील संभाव्य संगनमताचाही तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : सासवडच्या सोपानदेव मंदिरात अतिरेकींच्या अटकेचा थरार; पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलिसांकडून मॉकड्रील

तो कर्मचारी आहे तेथेच!

पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ निरीक्षकांना या मृत्यूकांडात जबाबदार धरून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पण, तेथील कामकाज पाहणारा तो कर्मचारी अद्यापही आहे तसाच आहे. त्याच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने पोलिस दलात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रजापतीशी संपर्क असल्यावरून चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली केली. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलासा का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Shocking information has been revealed from the investigation into the poisonous liquor case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.