Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पापा जाधव हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

राजुरा शहरातील चर्चित विनोद जाधव उर्फे पापा हत्याकांडाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2026 | 03:00 PM
पापा जाधव हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

पापा जाधव हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

Follow Us
Follow Us:
  • पापा जाधव हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट
  • पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर
  • चार आरोपींना अटक केली
राजुरा : राजुरा शहरातील चर्चित विनोद जाधव उर्फे पापा हत्याकांडाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून, तपासादरम्यान चार देशी कट्टे, आठ काडतुसे आणि चार रिकाम्या मॅगझिन असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. दरम्यान, हत्येच्या वेळी मुख्य आरोपी कार्तिक खामनकर हा नागपूरला गेल्याचे भासवले होते. मात्र प्रत्यक्षात घटनास्थळीच उपस्थित असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

कार्तिक यापूर्वी पापा जाधव याच्यासोबत आयपीएल सट्टेबाजीच्या व्यवसायात सहभागी होता. नंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आपल्या विरोधात होणाऱ्या कारवाईची माहिती जाधव याच्याकडून दिली जात असल्याचा कार्तिकला संशय असल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच त्याच्या मुलांना त्रास दिल्याचा आणि काही दिवसांपूर्वी धमकी दिल्याचाही आरोप तपासात समोर आला आहे. या कथित रागातून आणि भीतीच्या भावनेतून कार्तिकने करण मेकलवार व करण बाविस्कर यांना जाधवच्या हत्येची कथित सुपारी दिल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आत्मसमर्पण केल्यास दोन्ही आरोपींच्या कुटुंबियांची आर्थिक जबाबदारी घेण्याचे आश्वासन कार्तिकने दिल्याचा तपासात दावा आहे. त्यासाठी मनीऑर्डरच्या माध्यमातून पैसे पाठविण्याचेही सांगितल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हत्येचा कट प्रत्यक्षात राबविण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून हत्येचा नेमका कट, शस्त्रांची उपलब्धता, आरोपींच्या परस्पर संबंधांसह प्रत्येक आरोपीची भूमिका तपासली जात आहे. तपासातून आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात, शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

नागपूरला गेल्याचे भासविले

हत्येच्या दिवशी पोलिसांचा संशय येऊ नये म्हणून कार्तिक नागपूरला गेल्याचे समोर आले होते. मात्र, तपासादरम्यान हत्येच्या वेळी तो घटनास्थळीच उपस्थित असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. हत्येत सहभागी असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या आरोपींच्या चौकशीत मुख्य आरोपी म्हणून कार्तिकचे नाव समोर आल्यानंतर त्याची भूमिका पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे.

हे सुद्धा वाचा : बनावट पदव्यांचा मास्टरमाईंड ताब्यात, नागपूर येथून केली अटक; महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता

Web Title: Shocking information has emerged from the investigation into the papa jadhav murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई
1

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?
2

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात
3

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं
4

Jalgaon News: घरफोड्यांचा खेळ अखेर संपला! मध्य प्रदेशातील संशयितांना अमळनेर पोलिसांनी पकडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.