Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur: एसटीचा पास नाही म्हणून कंडक्टरने पाचवीतील चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवलं; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न

मंगळवेढ्यात एसटी बस कंडक्टरने पास नसल्याच्या कारणावरून पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला थेट हायवेवर उतरवल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 11, 2026 | 10:49 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पास चुकून घरी राहिल्याने तिकीट काढता आलं नाही
  • महिला प्रवाशाची मदत कंडक्टरने नाकारली
  • कंडक्टरने हायवेवर बस थांबवून मुलाला उतरवलं
सोलापूर: सोलापुरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एसटी बसचा पास नाही म्हणून कंडक्टरने चक्क पाचवीत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलाला हायवेवरच लालपरीतून उतरवल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी मंगळवेढ्यात घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर विध्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

काय घडलं नेमकं?

पाचवीत शिकणारा प्रथमेश राहुल पाटील हा मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहे. तो मंगळवेढा येथे शाळेसाठी नियमित आत असतो. शनिवारी सकाळी त्याच्या पालकांनी त्याला शाळेत सोडलं. शाळा सुटल्यानंतर प्रथमेश घरी येत असतांना तो मंगळवेढ्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या 9405 क्रमांकाच्या एसटी बसमधून प्रवास करीत होता. मंगळवेढा सोलापूर रस्त्यावरील दामाजी कारखाना पाटीच्या पुढे एसटी बस आल्यावर कंडक्टरने पास मागितला. यावर प्रथमेशने दप्तरामध्ये असणारा पास शोधला. मात्र यानंतर त्याच्या लक्षात आले की आपला पास घरीच राहिला आहे. त्याने कंडक्टरला पास घरी राहिल्याचे सांगितले. त्यांनतर कंडक्टरने पैसे देऊन तिकीट काढण्याचे सांगितले. मात्र प्रथमेशकडे पैसेही नव्हते.

Washim Crime: वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत

त्याने तुम्ही माझ्या पप्पांना फोन करा…ते तुम्हाला पैसे पाठवून देतील…अशी कंडक्टरला त्याने विनवणी केली. मात्र असं न करता एसटी बसच्या कंडक्टरने मंगळवेढा सोलापूर हायवेवरच एसटी थांबवून प्रथमेशला बसच्या खाली उतरवले. जवळ पैसे नाही… पासही नाही… अश्या परिस्थिती हायवेवर उतरलेला प्रथमेश घाबरला. त्याला रडू कोसळले. त्याने रस्त्यावरील वाहनांना हात दाखवला आणि आपले मूळगाव असणाऱ्या ब्रह्मपुरीपर्यंत दुचाकीवर जाऊन पोहोचला.

प्रवाशाने केली विनंती तरीही…

एसटी बसमध्ये प्रथमेशच्या बाजूला एक महिला प्रवाशी बसली होती. तिने माझ्याजवळ माझ्या तिकिटाव्यतिरिक्त केवळ 15 रुपये आहेत. हे पैसे घ्या आणि चिमुकल्याला प्रवास करू द्या. अशी विनंती कंडक्टरला केली. मात्र या विद्यार्थ्याच्या प्रवासासाठी अजून ११ रुपये कमी पडतात. असं सांगत कंडक्टरने महिला प्रवाशाचीही विनंती नाकारली.

प्रथमेश घरी पोहोचल्यानंतर त्याने घडलेली सगळी घटना आपल्या वडिलांना सांगितली. यांनतर तात्काळ पालकांनी मंगळवेढा आगार प्रमुखांकडे रीतसर तक्रार दिली आहे. यामध्ये मंगळवेढा एसटी आगार आणि एसटी प्रशासनाकडून मंदिर घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन प्रथमेशच्या पालकांना मिळाले आहे.

सुरक्षेचं प्रश्न ऐरणीवर

या घटनेनंतर विध्यार्थ्यांच्या सुरक्षेचं प्रश्न ऐरणीवर आला आहे. अश्याप्रकारे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच एका चिमुकल्या सोबत असं वागणं हे चुकीचे असल्याचे सांगितलं जात आहे.

Haryana Crime: पतीकडून होणाऱ्या शारीरिक छळाचा संताप; प्रियकराने उशीने दाबलं तोंड तर पत्नीने गुप्तांगावर….

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलाला बसमधून का उतरवलं?

    Ans: पास घरी राहिला होता आणि तिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते.

  • Que: प्रवाशांनी हस्तक्षेप केला का?

    Ans: होय, एका महिला प्रवाशाने पैसे देण्याची तयारी दर्शवली, मात्र कंडक्टरने नकार दिला.

  • Que: पालकांनी काय भूमिका घेतली?

    Ans: मंगळवेढा एसटी आगारात लेखी तक्रार दाखल केली.

Web Title: Solapur the conductor made a fifth grade child get off the bus directly onto the highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Washim Crime: वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत
1

Washim Crime: वाशीम रेल्वे स्थानकाजवळ सापडलेल्या त्या महिलेच्या मृतदेहाचा गूढ उलगडलं; आरोपी अटकेत

Haryana Crime: पतीकडून होणाऱ्या शारीरिक छळाचा संताप; प्रियकराने उशीने दाबलं तोंड तर पत्नीने गुप्तांगावर….
2

Haryana Crime: पतीकडून होणाऱ्या शारीरिक छळाचा संताप; प्रियकराने उशीने दाबलं तोंड तर पत्नीने गुप्तांगावर….

Hyderabad Crime: आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष दिल, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, सासूनेही उचलले टोकाचे पाऊल; काय नेमकं प्रकरण?
3

Hyderabad Crime: आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष दिल, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, सासूनेही उचलले टोकाचे पाऊल; काय नेमकं प्रकरण?

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो
4

आधुनिकता आणि परंपरेचा संगम! सोलापूरच्या सिध्दरामेश्वर यात्रेत यंदा ३०० ड्रोनचा भव्य लाईट शो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.