काय घडलं नेमकं?
वाशीम रेल्वे स्थानक परिसरातील विषम कक्षणजीक एका अज्ञात महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (९ जानेवारी) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेची वय ४५ ते ५० वर्ष अशी आहे. महिला बेशुद्धावस्थेत पड्लेलू असल्याची माहिती रेल्वे स्टेशन अधीक्षक कार्यालयाकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पाहणीदरम्यान विश्रामगृहाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या संरक्षण भिंतीलगत अंदाजे महिला अर्धनग्न अवस्थेत आढळून आली. महिलेच्या कपाळावर जखमा आढळून होत्या. जखमांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता. त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना टोकदार दगड आढळून आला. परिसरात देशी व विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्याही सापडल्या होत्या. त्याचबरोबर पॅन्टचा बेल्ट आणि इतर खाण्याचे साहित्य मिळाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा आरोपी त्यांना सापडला.
आरोपीला अमरावतीतून अटक
पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार येथील संतोष रामराव खंडारे याला अकोला रेल्वे स्थानक परिसरातूनच अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली. त्यात त्याने हत्या केल्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की त्याने आधी महिलेवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिला मारले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत असून तपास सुरु आहे.
Ans: वाशीम रेल्वे स्थानक परिसरातील विश्राम कक्षाजवळ.
Ans: आधी अत्याचार, त्यानंतर दगडाने ठेचून हत्या.
Ans: आरोपी अटकेत, खुनाचा गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू.






