नेमकं प्रकरण काय?
२०१२ मध्ये आरोपी पत्नी सरिताच्या मृतक रामकिशन नावाच्या तरुणासोबत विवाह झाला होता. रामकिशन हा सरिताहून ८ वर्षाने मोठा होता. त्यामुळे त्याला सतत त्याच्या नात्याबाबत काळजी लागून राहायची. तो सहसा सरिताच्या कोणत्या दुसऱ्या पुरुषासोबत बोलू देत नव्हता, कारण आपली पत्नी आपल्याला सोडून तर जाणार नाही ना, अशी त्याला सतत चिंता वाटायची. एवढेच नव्हे तर, रामकिशन त्याच्या पत्नीला मारहाण देखील करत होता.
५ डिसेंबरच्या रात्री सरिता आणि रामकिशन यांच्यामध्ये असाच भांडण झालं. त्यावेळी, रामकिशनने नशेत सरितासोबत जबरदस्ती संबंध प्रस्तापित केले आणि तिला मारहाण देखील केली. पतीच्या या वागण्याला आणि कृत्याला वैतागून अखेर सरिताच्या त्याचा काटा काढायचं ठरवलं.
सरिताचा पती नेहमी गांजाच्या नशेत असायचा आणि तो बऱ्याचदा पॉर्न व्हिडीओ बघून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित करायचा याच कारणामुळे, तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या करण्याचा प्लॅन आखला. सोमवारी रात्री रामकिशन झोपल्यानंतर, सरिताच्या तिच्या प्रियकराला बोलावलं. त्यांनतर, प्रियकराने रामकिशनचं उशीने तोंड दाबलं आणि सरिताने पतीचं गुप्तांग दाबलं. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी सरिता आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही आहे.
गुन्हेगारी रेकॉर्ड
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतांना पोलिसांना राम किशन, सरिता आणि तिच्या प्रियकराचे गुन्हेगारी रेकॉर्ड सापडले. रामकिशनवर चोरी आणि ड्रग्जच्या गैरवापराचे गुन्हे होते, सरितावर खंडणीचे आरोप होते. रामकिशन आणि महिलेचा प्रियकर यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. खरं तर, तुरुंगात असतानाच दोघांची एकमेकांसोबत भेट झाली होती. संबंधित महिलेचा प्रियकर दोन महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता आणि त्यानंतर, सरिता आणि त्याचे प्रेमसंबंध सुरू झाले.
Crime News: पुण्यातील मतदारांना पैशांचे आमिष? बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Ans: सोनीपत, हरियाणा येथे.
Ans: पत्नी सरिता आणि तिच्या प्रियकराने मिळून.
Ans: पतीकडून होणारा शारीरिक छळ, नशेत जबरदस्तीचे संबंध आणि संशय.






