Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हनिमूनला पतीची हत्या; जामीन मिळताच सोनम रघुवंशीने तोडले मौन, म्हणाली, नेपाळला…

Sonam Raghuvanshi : इंदूरमधील चर्चित राजा हत्याकांडाला आता एक नवे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पोलिस कोठडीतून बाहेर आल्यानंतर सोनमने प्रथमच माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 16, 2026 | 03:09 PM
हनिमूनला पतीची हत्या; जामीन मिळताच सोनम रघुवंशीने तोडले मौन, म्हणाली, नेपाळला...

हनिमूनला पतीची हत्या; जामीन मिळताच सोनम रघुवंशीने तोडले मौन, म्हणाली, नेपाळला...

Follow Us
Follow Us:
  • चर्चेत असलेल्या आरोपांवर संबंधित व्यक्तीने प्रथमच सार्वजनिक प्रतिक्रिया दिली.
  • तपास यंत्रणांनी न्यायालयात महत्त्वाची मागणी करत पुढील कारवाईची भूमिका स्पष्ट केली.
  • प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी केंद्रीय तपास संस्थेकडे चौकशी सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे.
इंदूर येथील रहिवासी राजा रघुवंशी याची मे २०२५ मध्ये मेघालय पत्नीकडूनच निघृण हत्या करण्यात आली. लग्नाच्या काही दिवसांनंतरच हनिमूनला गेले असताना पत्नीने अन्य साथीदारांच्या मदतीने या हत्येचा कट रचला. हे प्रकरण त्यावेळी प्रचंड चर्चेत राहिले. पोलिसांनी आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला अटक केली. तथापि २७ एप्रिल २०२६ रोजी शिलांग येथील सत्र न्यायालयाने सोनमला जामीन मंजूर केला आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर सोनमने पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिबंधानंतरही खुलेआम विक्री; चायनीज मांजाने गळ्याभोवती घातला विखळा, मंत्र्यांच्या पुतण्याला गंभीर दुखापत

राजाच्या मोठ्या भावाने केलेले आरोप फेटाळले

सोनम जामीनावर बाहेर आल्यानंतर राजाचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी याने आरोप लावला की, सशर्त जामिनावर बाहेर असलेली सोनम पोलिसांना चकमा देऊन नेपाळला पळून गेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी. यावर सोनमने आपली प्रतिक्रिया देत हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी बोलताना सोनमने म्हटले की, नेपाळला पळून जाण्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. लोकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही तिने सांगितले. सोनमला ती इंदूरला कधी जाणार असा प्रश्न विचारताच तिने स्पष्टपणे नकार दिला. सोनमने युक्तिवाद केला की, जिल्हा न्यायालयाने घालून दिलेल्या जामिनाच्या अटींचे ती पूर्णपणे पालन करत आहे आणि ती लगेच इंदूरला परत येणार नाही.

कुठे राहणार सोनम?

प्रसारमाध्यमांशी बोलताना सोनमने असेही सांगितले की, ती सध्या मेघालयची राजधानी शिलाँग इथे राहून न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्वांचे पालन करेल. तथापि, शिलाँगमध्ये ती कुठे राहत आहे आणि तिचा खर्च कसा भागत आहे यावर तिने माैन धरले. तिने सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव ती आपल्या राहण्याचे नेमके ठिकाण सांगू शकत नाही आणि खर्चाचा मुद्दा तिचा वैयक्तिक आहे.

पुन्हा कोठडीत टाकण्याची पोलिसांची मागणी

हे लक्षात घेतले पाहिजे की, राजा रघुवंशी हत्याकांडात न्यायालयाने पोलिसांच्या तांत्रिक चुका आणि त्रुटींचा फायदा घेत सोनमला सशर्त जामीन मंजूर केला. यानंतर मेघालय पोलिसांनी या जामीनाला हाय कोर्टात आव्हान दिले आहे. पोलिसांनी कोर्टात याचिका दाखल केली असून सोनमचा जामीन रद्द करुन तिला पुिन्हा कोठडीत पाठवण्याची मागणी यात करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रदीर्घ सुनावणीनंतर, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

सासवड येथे वकिलाची केली गेली फसवणूक; भागीदारीत जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु करून…

भावाने केली CBI चाैकशीची मागणी

दुसरीकडे, मृत राजा रघुवंशी याचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी याने या हाय प्रोफाईल मर्डर केसची CBI चाैकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. विपिनचे युक्तिवाद आहे की, जर मुलींसंबंधित प्रकरणांमध्ये सीबीआय चाैकशीला तत्काळ मंजूरी मिळू शकते तर मुलाच्या हत्या प्रकरणात असं का घडत नाही? दरम्यान हे प्रकरण दोन राज्यांशी जोडले गेल्याने निष्पक्ष न्यायासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा हस्तक्षेप फार महत्त्वाचा आहे.

 

Web Title: Sonam raghuvanshi breaks silence after getting bail in raja raghuvanshi murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • crime news
  • indore
  • Murder Case
  • Sonam Raghuvanshi

संबंधित बातम्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
1

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
2

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
4

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.