(फोटो सौजन्य: X)
Mumbai Crime: ‘CA’ नोकरीचे आमिष, लग्नाचे वचन अन् शोषण; मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप
बरेलीतील वर्दळीच्या भागांपैकी एक असलेल्या श्यामगंज उड्डाणपुलावर सोमवारी हा अपघात घडला. १५ वर्षीय किशोरवयीन वीर सिंह गंगवार बाईकने जात असतानाच अचानक चायनीज मांजाच्या कचाड्यात अडकला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. ही मांजा गळ्याभोवती अडकल्याने गळ्याला मोठी जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, वीर सिंह गंगवार आपल्या बाईकने स्टेडियमला जात होते, जेव्हा तो श्यामगंज फ्लाईओवरपर्यंत पोहचला तेव्हा अचानक हवेत लटकणारा चायनीज मांजा त्याच्या गळ्याभोवती येऊन अडकला. वीर वेगाने बाईक चालवत असल्यामुळे मांजा गळ्याभोवती वाईटरित्या अडकला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. गळ्याला मांजाने कट बसल्याने त्याला रक्तस्त्राव होऊ लागला आणि बाईकसोबतच वीर रस्त्यावर पडला. घटनास्थळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी कुटुंबाला संपर्क करत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवली ज्यानंतर काहीवेळाने वीरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी पसरताच, स्थानिक रहिवाशांनी आपला संताप व्यक्त केला असून बंदी असतानाही चिनी धागा उघडपणे कसा विकला जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
घटनेची माहिती मिळताच ऊस मंत्री संजय गंगवार तात्काळ पिलीभीतहून बरेलीला पोहोचले. रुग्णालय गाठत त्यांनी डाॅक्टरांकडून उपचारांची चौकशी केली आणि कुटुंबाची भेट घेतली. घटनेविषयी दु:ख व्यक्त करताना मंत्री संजय गंगवार यांनी म्हटले की, सरकारने आधीच चायनीज मांजावर बंदी घातली आहे, परंतु यानंतरही अशा घटना घडणे ही चिंतेची बाब आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात प्रशासनाकडून उत्तरे मागितली जातील.
भांडण सोडविण्यासाठी जाण तरुणाला भोवलं; पोटावर अन् मानेवर सपासप वार करुन खून
बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी सांगितले की, चायनीज मांजाविरोधात आधीच अभियान सुरु आहे, या घटनेनंतर ते आणखी तीव्र केले जाईल. तसेच जिथेही चायनीज मांजा विकताना दिसेल तिथे कठोर कारवाई केली जाईल अशा विश्वास त्यांनी जनतेला दिला आहे .






