Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त

बारामती शहर व तालुका परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या बुलेट मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 14, 2026 | 04:19 PM
बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त

बारामती पोलिसांची मोठी कारवाई, बुलेट चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल ३० लाखांच्या दुचाकी जप्त

Follow Us
Follow Us:

बारामती :  बारामती शहर व तालुका परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या बुलेट मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे. सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल ३० लाख रुपये किमतीच्या १३ बुलेटसह सहा अन्य मोटारसायकली अशा एकूण १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे १९ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो सीआरपीएफ मध्ये नोकरीस होता, मात्र काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन त्याने हे उद्योग सुरू केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बुलेट चोरीच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी विशेष पथके तयार केली. या पथकांकडून बारामती शहरात रात्रगस्त, पेट्रोलिंग तसेच संशयित वाहने व व्यक्तींची तपासणी सुरू करण्यात आली.

दरम्यान, एक संशयित व्यक्ती चोरीची मोटारसायकल घेऊन मेडिकल कॉलेज परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पेन्सिल चौकाकडून मेडिकल कॉलेजच्या दिशेने चोरीची मोटारसायकल घेऊन जाणाऱ्या संशयिताला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे सांगितले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने बुलेटसह अन्य मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे, चोरीच्या वाहनांवर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा तसेच एसटी महामंडळाचे लोगो लावून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये १३ बुलेट मोटारसायकली आणि सहा अन्य मोटारसायकलींचा समावेश आहे. या वाहनांची एकूण किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :  ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

कारवाईमुळे बारामती शहर व बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण १९ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून, त्याच्याकडून आणखी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या उल्लेखनीय कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास बारामती तालुका पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Web Title: The baramati police have arrested a two wheeler thief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Theft Case

संबंधित बातम्या

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?
1

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
2

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक
3

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक

ओवेसींना खंडपीठाचा दणका, दाखल गुन्हा रद्द करण्यास नकार; नेमकं प्रकरण काय?
4

ओवेसींना खंडपीठाचा दणका, दाखल गुन्हा रद्द करण्यास नकार; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.