Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime : कोयत्यासह तरुण पोलिसांच्या ताब्यात; शिवाजी चौक पोलीस ठाणे परिसरात मोठी कारवाई

अवैध शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध लातूर पोलिसांनी धडक मोहीम सुरू ठेवली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजी चौक परिसरात धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 18, 2026 | 12:24 PM
MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; थेट अवर सचिवालाच केली अटक

MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; थेट अवर सचिवालाच केली अटक

Follow Us
Follow Us:

लातूर : अवैध शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध लातूर पोलिसांनी धडक मोहीम सुरू ठेवली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवाजी चौक परिसरात धारदार लोखंडी कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत धारदार कोयता आणि सुझुकी कंपनीची एक्सेस दुचाकी असा एकूण अंदाजे ८०,४००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी गस्त घालत असताना शिवाजी चौक परिसरातील क्रीडा संकुलाच्या गेटसमोर असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. छत्रपती शिवाजी चौक ते राजीव गांधी चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दत्त मंदिरासमोर, पुढारी पान स्टॉलजवळ दोन तरुण काळ्या रंगाच्या सुझुकी एक्सेस दुचाकीवर बसून हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांचे पथक जवळ जात असताना दोघांपैकी एक तरुण पळून गेला. दुसऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने आपले नाव १) अर्जुन सखाराम जाधव (वय २१, रा. दादोजी कोंडदेव नगर, लातूर) असे सांगितले. त्याच्यासोबत असलेल्या व पळून गेलेल्या तरुणाचे नाव २) कृष्णा अरविंद खुडे (रा. लोदगा, ता. औसा, जि. लातूर, सध्या रा. दादोजी कोंडदेव नगर, लातूर) असल्याचे तपासात समोर आले आहे. ताब्यात घेतलेल्या अर्जुन जाधव याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या उजव्या हातात धारदार लोखंडी कोयता आढळून आला. तसेच घटनास्थळी असलेली सुझुकी कंपनीची एक्सेस दुचाकी क्रमांक एम.एच.२४ सी.जी.४७०७ जप्त केली.

हे सुद्धा वाचा : लातूरमध्ये अघोरी पूजेचा कट पोलिसांकडून उद्ध्वस्त; अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून लोकांसमोर…

कारवाई दरम्यान सुमारे ४००/- किमतीचा लोखंडी कोयता आणि अंदाजे ८०,०००/- किमतीची दुचाकी, असा एकूण ८०,४००/-किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रसूल पठाण, अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, मनोज खोसे, सुधीर कोलसुरे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे. अवैध शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध लातूर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू असून, सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.

Web Title: The latur police have arrested a young man who was roaming around carrying a weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Latur

संबंधित बातम्या

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
1

शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…
2

धक्कादायक ! अनैतिक संबंधातून प्रियकराने केली महिलेची हत्या; शॉकचा रचला बनाव अन् नंतर…

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
3

वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.