सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संतोष बबन मोरे (वय ४३, रा. शिरापूर, ता. पारनेर), दत्तात्रय रामदास भागवत (४१, रा. खडकवाडी), गणेश सुदाम पडवळ (४०, रा. सविंदणे, ता. शिरूर), आनंदा मारुती पवार (५६, रा. टाकळकरवाडी, ता. खेड), कुलदीप प्रकाश पवळे (३०, रा. चव्हाण मळा, खेड), रविराज बबन थोरात (३२, रा. चांडोली बुद्रुक), राजेंद्र भगवान सिनलकर (४८, रा. लोणी), ओंकार पोपट गिरवले (२८, रा. देवळगाव सिद्धी, अहिल्यानगर), आशिष विठ्ठल लोंढे (३०, रा. लोंढेमळा, एकलहरे) आणि सतीश महादू वाबळे (४७, रा. चांडोली खुर्द) यांना अटक केली आहे. एकूण आरोपी 36 झाले असून त्यातील 14 जणांना यापूर्वकाळात अटक करण्यात आले. तसेच रविवारी दहा जणांना अटक करण्यात आले आहे. तर 12 जण अद्यापही फरार आहे.
रविवारी अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींना न्यायालयात हजर केले असता ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेले १४ आरोपी न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, भेसळयुक्त दूध निर्मिती व वितरणाच्या साखळीचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : बारवर गुन्हे शाखेची छापा कारवाई; आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल 89 ग्राहक आढळले






