Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषात ध्वनिमर्यादेचा विसर पडलेल्या मंडळांसह डीजे चालकांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. निर्धारित ध्वनिमर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविणाऱ्या आयोजकांवर कारवाई करत पोलिसांनी विविध ठिकाणांहून डीजेचे साहित्य जप्त केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 08, 2026 | 02:06 PM
दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका
  • दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर कारवाई
  • तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
पिंपरी : दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषात ध्वनिमर्यादेचा विसर पडलेल्या मंडळांसह डीजे चालकांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. निर्धारित ध्वनिमर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजविणाऱ्या आयोजकांवर कारवाई करत पोलिसांनी विविध ठिकाणांहून डीजेचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पिंपरी- चिंचवड शहरातील विविध कार्यक्रमस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी ध्वनिवर्धक यंत्रणांचा नियमबाह्य पद्धतीने वापर होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित डीजेचे साहित्य ताब्यात घेतले.

 

ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक आणि डीजे मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि बसवराज तेली यांनी ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

कुठे किती गुन्हे?

पोलीस ठाणे गुन्हे
निगडी ४
बावधन ३
पिंपरी १
संत तुकाराम नगर १
दापोडी १
हिंजवडी १
वाकड १
काळेवाडी १
भोसरी १
दिघी १
चाकण दक्षिण १
एकूण १६

मोठ्या आवाजातील ध्वनिवर्धकामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, आगामी सण-उत्सवांमध्येही ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करून डीजे वाजविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा : गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 

गणेशोत्सवातील तीव्र आवाजाच्या डीजेचा वाद सुरू असतानाच शहरात वर्षभर वेगवेगळ्या निमित्ताने लावलेल्या साऊंड सिस्टीमच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक त्रस्तच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, गेल्या आठ महिन्यात पुणे पोलिसांकडे तब्बल १४ हजार ३९२ कॉल्स आवाजासंदंर्भात आले आहेत. दरम्यान, या आठ महिन्यातच ध्वनी प्रदूषणाबाबत शहरात ४१३ गुन्हे नोंदवले आहेत. पुणे शहरात वर्षभर सण, उत्सव, मिरवणुका, खासगी पार्ट्या तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ध्वनिक्षेपकांचा वापर केला जातो. मात्र, निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे आणि ध्वनिक्षेपक वाजविल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. याच त्रासातून पुणेकरांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षासह विविध माध्यमातून तक्रारी केल्या आहेत.

Web Title: The pimpri chinchwad police have taken major action against those playing dj music during dahi handi celebrations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • crime news
  • DJ Speaker
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना
1

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू
3

Pimpri Chinchwad : देहूच्या भंडारा डोंगरावर सापडले अवघ्या दीड वर्षाचे गोंडस बाळ! नाव ना पत्ता… आई-वडिलांचा शोध सुरू

Pune Murder : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले
4

Pune Murder : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.