संग्रहित फोटो
पाडुळे आणि त्याचा साथीदार चारुदत्त चव्हाण यांच्याविरुद्ध गांजा तस्करी प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. चव्हाण याच्याकडून ३५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाडुळे पसार झाला. तपासात पाडुळे हा पुणे शहरात गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. गेले चार महिने तो पोलिसांना सापडत नव्हता. पाडुळे याने वेशभूषा बदलली होती, तसेच तो समाज माध्यमाचा वापर करत नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचण आली होती.
पाडुळे हा म्हाडा वसाहतीत आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, संदीप आगळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. पाडुळे याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ, लोणी काळभोर, वानवडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, तो या गुन्ह्यात पसार होता.
गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला
रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने वार केले. नंतर तिसऱ्याने डोक्यात दगडही घातल्याचे समोर आले आहे. ही घटना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे. अक्षय महादेव बोंबाळे (वय २८, रा. पुणा गेस्ट हाऊस, बुधवार पेठ) असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. रॉकी रणजित पात्रौ तसेच विकी रणजित पात्रौ (रा. रेल्वे कॉर्टर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






