सौजन्य - सोशल मिडीया
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारमधील असलेल्या या तरुणाने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये कर्नाटकच्या विधान सौध इमारतीत भीषण बॉम्बस्फोट झाल्याचे दृश्य दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नसून, संबंधित व्हिडिओ AI च्या साहाय्याने तयार करण्यात आल्याचे समोर आले.
असा घेतला आरोपीचा शोध
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल केला. त्यानंतर व्हिडिओचा स्रोत आणि तो पोस्ट करणाऱ्या इन्स्टाग्राम अकाउंटची माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू करण्यात आला. डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संबंधित अकाउंटचा माग काढला आणि संशयित तरुणाला अटक केली आहे.
आरोपी पोलीस कोठडीत
अटक करण्यात आलेला तरुण रोजंदारीवर पाईप फिटर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून, त्याने हा बनावट व्हिडिओ कोणत्या उद्देशाने तयार केला, तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यामागे नेमका हेतू काय होता आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
AI च्या मदतीने वास्तवासारखे दिसणारे व्हिडिओ तयार करणे शक्य झाले आहे. मात्र, अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर करून खोट्या घटना खऱ्या असल्याप्रमाणे दाखवल्यास नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या संवेदनशील व्हिडिओंची सत्यता पडताळल्याशिवाय ते पुढे पाठवू नयेत, असे आवाहन करण्यात येते. या प्रकरणात आरोपीचा नेमका हेतू आणि व्हिडिओच्या प्रसारामागील कारणे पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.
हे सुद्धा वाचा : आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून
Ans: कर्नाटकच्या विधान सौधमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा बनावट AI व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.
Ans: आरोपी २५ वर्षांचा असून, तो रोजंदारीवर पाईप फिटर म्हणून काम करतो.
Ans: बनावट व्हिडिओ तयार करण्यामागील हेतू आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.






