Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साक्षीदार होण्याच्या प्रयत्नात फसला, ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; दोघांना ठोकल्या बेड्या

वैजापूर तालुक्यातील बेलगाव-वैजापूर मार्गावर आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले असून, स्वतःला साक्षीदार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्तीच पोलिस तपासात आरोपी म्हणून समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2026 | 12:02 PM
साक्षीदार होण्याच्या प्रयत्नात फसला, 'त्या' तरुणाच्या खुनाचा लागला छडा; दोघांना ठोकल्या बेड्या

साक्षीदार होण्याच्या प्रयत्नात फसला, 'त्या' तरुणाच्या खुनाचा लागला छडा; दोघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

वैजापूर : वैजापूर तालुक्यातील बेलगाव-वैजापूर मार्गावर आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलले असून, स्वतःला साक्षीदार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्तीच पोलिस तपासात आरोपी म्हणून समोर आली आहे. राजस्थानातील निंबाला गावचा रहिवासी सीताराम छगन बावरी याच्या खूनप्रकरणी ऋषिकेश अजय त्रिभुवन (वय २३, रा. बेलगाव, ता. वैजापूर) आणि राहुल पप्पू कुंभारकर (वय १८, पोटे गल्ली, वैजापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

 

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बेलगाव रस्त्यावर तिघे एकमेकांसमोर आले. तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. सीताराम कथितपणे शिवीगाळ करत होता. त्यावेळी ऋषिकेशला त्या शिव्या आपल्यालाच उद्देशून दिल्या जात असल्याचा संशय आला. काही क्षणांतच शाब्दिक वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले.

तोंडात कापड, कचऱ्याचा बोळा कोंबला

आरोपींनी सीतारामच्या डोक्यावर आणि पोटावर लाकडाने वार केल्याचा आरोप आहे. मारहाण इतकी गंभीर होती की, तो गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. सूत्रांच्या माहितीनुसार, सीताराम जखमी अवस्थेत पडलेला असतानाही आरोपींचा संताप शांत झाला नाही. त्याला जवळील निर्जनस्थळी नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली. तपासात असेही समोर आले आहे की, तो बेशुद्ध अवस्थेत असताना त्याच्या तोंडात कापड व कचऱ्याचा बोळा कोंबण्यात आला त्यानंतर त्याच्या अंगावर वाळलेले गवत टाकून त्याला पेटवून दिल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर आरोपींनी मृतकाच्या खिशातील साडेतीनशे रूपये काढून घेतले.

आरोपीची खेळी आरोपीच्याच अंगलट!

आरोपी ऋषिकेशने घटनेनंतर स्वतःवरील संशय दूर करण्यासाठी वेगळाच डाव आखला होता. त्याने रात्री गावातील काही लोकांना फोन करून बेलगाव रोडवर भांडण सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे स्वतःला घटनेचा प्रत्यक्षदर्शी किंवा माहिती देणारा व्यक्ती म्हणून दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतशी संपूर्ण कहाणी बदलत गेली. पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांमुळे आणि चौकशीत समोर आलेल्या तथ्यांमुळे संशयाची दिशा बदलली. अखेरीस स्वतःला साक्षीदार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्तीच पोलिस तपासात आरोपी म्हणून समोर आली.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या जागेवरच मिटणार; ‘या’ तारखेला सासवडमध्ये विशेष कॅम्प

घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलने झाला उलगडा

पोलिस सूत्रांच्या मते, या घटनेमागे केवळ राग नव्हता, तर मृताची ओळख नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मृतदेहाचा चेहरा मोठ्या प्रमाणात जळालेला होता आणि अंगावर कपडेही नव्हते. त्यामुळे सुरुवातीच्या तपासात मृताची ओळख पटविणे अत्यंत कठीण झाले होते. मात्र घटनास्थळाजवळ सापडलेला मोबाईल फोन हा या तपासातील सर्वात महत्त्वाचा धागा ठरला. त्या मोबाईलच्या आधारे पोलिस मृत व्यक्तीपर्यंत पोहोचले. त्यानंतर तांत्रिक पुरावे, स्थानिक माहिती आणि चौकशीच्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले.

हे सुद्धा वाचा : ‘या’ कारणावरुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव; पुण्यातील गोखलेनगर प्रकरणात धक्कादायक खुलासा

Web Title: The police have arrested two accused persons for the murder of a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
2

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
3

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
4

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.