Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sillod Murder Case : सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या

सिल्लोड शहरात २९ जुलै रोजी झालेल्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी मयताच्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 03, 2026 | 12:18 PM
सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या

सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

सिल्लोड : सिल्लोड शहरात २९ जुलै रोजी झालेल्या खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी मयताच्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. सिल्लोड शहरालगत २९ जुलै २०२६ रोजी एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागील भागात एका व्यक्तीचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात येऊन पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्याकडे तपास देण्यात आला. सिल्लोड शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या चार दिवसांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख पटवून खुनामागील संपूर्ण कट उघडकीस आणला तसेच तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळविले. तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख अशोक ज्ञानसिंग मीना (वय ४०, रा. भोकाणवाडी, जि. खंडवा (मध्य प्रदेश) अशी पटली. पोलीसांच्या तपासानुसार, अशोक मीना यांचे सुमारे २१ वर्षांपूर्वी कौशल्या अशोक मीना (बैनाडे) हिच्याशी लग्न झाले होते. मात्र ती पतीपासून वेगळी राहत होती. तिचे रियाज शहा (रा. भोकरदन) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेच्या दिवशी कौशल्या हिने पती अशोक याला सिल्लोड येथे काम पाहण्याच्या बहाण्याने बोलावले. त्यानंतर रियाज शहा याच्याशी संपर्क साधून त्यांची भेट घडवून आणली. रियाजने अशोक याला एका हॉटेलमध्ये नेऊन मद्यपान घडविले.

हे सुद्धा वाचा : पाण्याच्या ड्रममध्ये सापडला 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृतदेह, तपासात आईच निघाली आरोपी; कारण धक्कादायक

दरम्यान त्याने आपला मित्र आकाश आत्माराम इंगळे (रा. जांभूळ, ता. जामनेर) याला बोलावून घेतले. तिघांनी संगनमताने एकता पेट्रोल पंप परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ अशोक मीना याचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. दरम्यान त्यानंतर मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले. सिल्लोड शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही, गोपनीय माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावत रियाज शहा, आकाश इंगळे आणि कौशल्या अशोक बैनाडे (मीना) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध अटकेची प्रक्रिया सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत

Web Title: The police have solved the murder case in sillod and arrested three individuals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Sillod Crime

संबंधित बातम्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी
1

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला, डोक्यात मारला दगडी खलबत्ता; पत्नी गंभीर जखमी

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत
2

पणदरे येथील गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून, पोलिसांची अवघ्या दोन तासांत कारवाई; २६ वर्षीय संशयित आरोपी अटकेत

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
4

जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.