Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट पदव्यांचा मास्टरमाईंड ताब्यात, नागपूर येथून केली अटक; महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता

नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या, गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्रे तयार करून त्यांची लाखो रुपयात विक्री केल्याच्या प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2026 | 12:15 PM
Thane Crme: आदिवासी आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींवर अत्याचार; स्वयंपाकगृहातील मदतनीसकडून घडला प्रकार

Thane Crme: आदिवासी आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींवर अत्याचार; स्वयंपाकगृहातील मदतनीसकडून घडला प्रकार

Follow Us
Follow Us:

चंद्रपूर : नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या, गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्रे तयार करून त्यांची लाखो रुपयात विक्री केल्याच्या प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड परिमल गौरकर आणि त्याच्या एका साथीदाराला शुक्रवारी सकाळी नागपूर येथील एका घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. गौरकरच्या अटकेमुळे या बनावट प्रमाणपत्रांच्या रॅकेटशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील बनावट पदवी व गुणपत्रिकांची पाच ते दहा लाख रुपये किमतीत विक्री केली जात असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. विशेषतः शासकीय नोकरी मिळविण्यासाठी तसेच नोकरीतील पदोन्नतीसाठी या बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. चंद्रपूर येथील वैभव माशीरकर यांनी या प्रकरणाची तक्रार दुर्गापूर पोलिसांकडे केली होती. तक्रारीची दखल घेत दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर आणि पोलिस उपनिरीक्षक रवींद्र नक्कनवार यांनी तपासाला सुरुवात केली. तांत्रिक माहिती तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाचा पाठपुरावा करत पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. या प्रकरणात यापूर्वी वैभव सोनुले या तरुणाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता परिमल गौरकर आणि त्याच्या साथीदाराला अटक झाल्याने या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या तीन झाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कथित मास्टरमाइंड गौरकर आणि यापूर्वी अटक करण्यात आलेला सोनुले हे दोघेही नातेवाईक आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या निर्मिती आणि विक्रीसंदर्भात नेमका काय संबंध होता? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. गौरकरला या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड मानले जात असल्याने त्याच्या चौकशीतून बनावट पदवी प्रमाणपत्रांच्या संपूर्ण साखळीचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रमाणपत्रे तयार करणारे, ती खरेदी करणारे, मध्यस्थ आणि त्यांचा शासकीय कामकाजात वापर करणारे यांच्यापर्यंत तपास पोहोचण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या पुढील तपासात या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत? किती बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आणि त्यातून किती रुपयांची उलाढाल झाली? हे स्पष्ट होणार आहे.

अनेक विद्यापीठांच्या नावाने बनावट कागदपत्रे

आरोपी गौरकर याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ यांसह कोल्हापूर, सोलापूर तसेच राजस्थान आणि कर्नाटकातील विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदव्या व गुणपत्रिका तयार केल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांची निर्मिती कशी केली जात होती? त्यासाठी कोणते तंत्रज्ञान किंवा साधने वापरली जात होती ? बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी आवश्यक माहिती आरोपींना कोठून मिळत होती आणि ही कागदपत्रे कोणकोणाला विकण्यात आली, याचा तपास सध्या सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, आईने आरडाओरड केली पण…; नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

शासकीय यंत्रणेत बनावट कागदपत्रांचा वापर ?

या रॅकेटचा सर्वाधिक गंभीर पैलू म्हणजे बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा शासकीय नोकरी आणि पदोन्नतीसाठी वापर झाल्याचा आरोप. त्यामुळे या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी किंवा पदोन्नती मिळविणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे? त्यातील किती प्रमाणपत्रे बनावट आहेत आणि संबंधित शासकीय विभागांमध्ये त्यांचा वापर झाला आहे का? याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: The police have taken the mastermind behind the fake degrees into custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
3

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण
4

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.