Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना ठोकल्या बेड्या; देशी बनावटीची पिस्तुले अन् १५ जिवंत काडतुसे जप्त

दोन फरार व पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे, एक मॅगझीन आणि क्रेटा कार असा सुमारे ११ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 19, 2026 | 12:30 AM
पुणे शहरातून तडीपार केलेल्या तीन गुंडाना पकडले

पुणे शहरातून तडीपार केलेल्या तीन गुंडाना पकडले

Follow Us
Follow Us:

पिंपरी : रावेत पोलिसांनी मोक्का कायद्यान्वये दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोन फरार व पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून दोन देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे, एक मॅगझीन आणि क्रेटा कार असा सुमारे ११ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सराईत, फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याबरोबरच अवैध अग्निशस्त्रधारकांविरुद्ध कारवाई करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

 

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृषिकेश घाडगे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई केली आहे.

यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

रावेत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात आरोपी विनोद निजप्पा गायकवाड (रा. रमाबाईनगर, रावेत) व अक्षय प्रभाकर साबळे (रा. काळभोरनगर, आकुर्डी) हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. फिर्यादीस मारहाण करून खंडणी मागितल्याप्रकरणी त्यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आरोपींवर यापूर्वीही शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील

दोन्ही आरोपींना शिताफीने घेतले ताब्यात

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे यांच्या पथकाने जाधववस्ती, रावेत परिसरातून दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील क्रेटा कारची झडती घेतली असता दोन देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे व एक मॅगझीन जप्त करण्यात आले. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक हृषिकेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे, सहायक पोलीस फौजदार संतोष कोळगे, पोलीस हवालदार आशिष बोटके, गोविंद चव्हाण तसेच विनायक मराठे, प्रदीप गायकवाड, अजित बेंडभर, सौदागर लामतुरे, विनोद कदम, निखील कपले व लोखंडे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

हे सुद्धा वाचा : शेतीच्या वादातून चुलत्याचा निघृण खून; दगड व काठीने मारहाण करुन जागेवरच संपवलं

Web Title: The ravet police have arrested two absconding accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
3

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.