Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूनंतर ‘उत्पादन शुल्क’ला जाग, पुणे-पिंपरीतून 4 हजार 480 लिटर गावठी दारू जप्त; 52 जणांना अटक

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील १७ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग (स्टेट एक्साईज) खडबडून जागा झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2026 | 10:49 AM
मृत्यूनंतर ‘उत्पादन शुल्क’ला जाग, पुणे-पिंपरीतून 4 हजार 480 लिटर गावठी दारू जप्त; 52 जणांना अटक

मृत्यूनंतर ‘उत्पादन शुल्क’ला जाग, पुणे-पिंपरीतून 4 हजार 480 लिटर गावठी दारू जप्त; 52 जणांना अटक

Follow Us
Follow Us:

पुणे : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील १७ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग (स्टेट एक्साईज) खडबडून जागा झाला आहे. शुक्रवारी अवैध दारूविरोधात धडक कारवाई करत विभागाने ५४ गुन्हे दाखल केले. या कारवाईत ५२ आरोपींना अटक करण्यात आली असून, ४ हजार ४८० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे सुमारे ४२ हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले आहे.

 

विशेषतः लोणी काळभोर, वाल्हे, पुरंदर, आंबी, तळेगाव आणि आपटी या भागांत ही कारवाई करण्यात आली आहे. विषारी दारूकांड उघडकीस आल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग, पुणे कार्यालय तसेच पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात छापे टाकून मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त केली.

विषारी दारू प्रकरणात पोलिसांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून दहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार योगेश राजेंद्र वानखेडे ऊर्फ सिकंदर राठोड (वय 23, रा. मुंढवा), राधेश्याम हरिराम प्रजापती (वय 35, रा. उरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता), कर्नलसिंग तखतसिंह विरका (वय 73) आणि गुरुमंगतसिंह कर्नलसिंग विरका (वय 45, दोघे रा. फुगेवाडी) यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दापोडी आणि हडपसर पोलिस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विषारी दारू प्रकरण उघडकीस आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी विविध भागांत छापे टाकले. तसेच रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची आणि वैद्यकीय तज्ज्ञांची भेट घेऊन माहिती संकलित केली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून 4 हजार 480 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपींची चौकशी करण्यात आली आहे.

हडपसरमधील पांढरे मळा परिसरात छापा टाकून आकाश जाधव याच्याकडून ७० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. दापोडीतील पवार वस्ती परिसरात छापा टाकून इरान कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १५५ लीटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच शिवाजीनगरमधील वडारवाडी येथे छापा टाकून आर्यन धोत्रे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४२० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण तापलं; कांदा दरासाठी बोलावलेल्या बैठकीतच नेत्यांमध्ये खडाजंगी

विक्री प्रकरणात विविध गुन्हे दाखल

गावठी दारू विक्री प्रकरणात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दारूमध्ये ‘मिथेनॉल’ मिसळल्याचा संशय असून त्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गावठी दारू विक्रीतून अधिक फायदा मिळावा तसेच ग्राहकांना अधिक नशा यावी, यासाठी मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याने दारूमध्ये अत्यंत घातक असे मिथेनॉल मिसळल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वानखेडे याने मुंबईहून ऑनलाइन पद्धतीने मिथेनॉल मागविल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Web Title: The state excise department has taken strong action against illegal liquor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • crime news
  • Pimpri Chinchwad
  • pune news

संबंधित बातम्या

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
1

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
2

मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…
3

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
4

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.