Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष; कोथरूडमधील एकाची 71 लाखांची फसवणूक

पुण्यातून एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. शेअर्स आणि आयपीओत कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ७१ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 22, 2026 | 12:30 AM
शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष; कोथरूडमधील एकाची 71 लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष; कोथरूडमधील एकाची 71 लाखांची फसवणूक

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यासह जगभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. शेअर्स आणि आयपीओत कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची ७१ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप आरोपींना अटक केलेली नाही. याबाबत मयूर कॉलनी येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. हा प्रकार २४ डिसेंबर २०२४ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदारांना शेअर्स व आयपीओमध्ये कमी रकमेची गुंतवणूक करून अधिकाधिक नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नंतर एका लिंकच्या माध्यमातून त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. पुढे लिंकद्वारे पूर्ण नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आदी माहिती भरून नोंदणी करण्यास सांगण्यात आले. यानंतर संबंधित कंपनीच्या नावाने ट्रेडिंग करण्यास सांगत सुरुवातीला २० हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले.

सुरुवातीला काही प्रमाणात नफा दाखवून तक्रारदारांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे जमा करण्यास सांगितले. या प्रकारातून तक्रारदारांची एकूण ७१ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू असून, मोबाइल क्रमांकधारक, व्हॉट्सअॅप ग्रुप चालक तसेच संबंधित बँक खातेदारांचा शोध घेतला जात आहे.

हे सुद्धा वाचा : चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली, एक ठार, तर ३३ प्रवासी जखमी

Web Title: There has been an incident where cyber thieves have cheated a person in kothrud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पुण्यात अक्षय म्हस्केवर गोळीबार करणार्‍या पाच जणांना ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून घेतले ताब्यात
1

पुण्यात अक्षय म्हस्केवर गोळीबार करणार्‍या पाच जणांना ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरातून घेतले ताब्यात

Twisha Sharma Death मिस पुणे ते मृत्यूचं रहस्य! ट्विशा-दीपिका मृत्यूंचं गूढ अधिक गडद!
2

Twisha Sharma Death मिस पुणे ते मृत्यूचं रहस्य! ट्विशा-दीपिका मृत्यूंचं गूढ अधिक गडद!

चंद्रभागेच्या पवित्र पात्रात दोन बेवारस मृतदेह; मंदिर समिती आणि पालिकेचा सुस्त कारभार चव्हाट्यावर!
3

चंद्रभागेच्या पवित्र पात्रात दोन बेवारस मृतदेह; मंदिर समिती आणि पालिकेचा सुस्त कारभार चव्हाट्यावर!

Rajapur Crime : चोरी करुन पळालेल्या ‘त्या’ आरोपींची गाडी पोलिसांना सापडली; आयफोनसह सात माेबाईलही हस्तगत
4

Rajapur Crime : चोरी करुन पळालेल्या ‘त्या’ आरोपींची गाडी पोलिसांना सापडली; आयफोनसह सात माेबाईलही हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.