Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘मध्यरात्रीत एक, दोन नव्हे तर…’; उंब्रजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांसमोर आव्हान

पाटण तिकाटणे परिसरात पूर्वी पोलिसांची नियमित रात्रगस्त असायची. मात्र अलीकडे ती बंद झाल्याने चोरट्यांनी याचाच फायदा घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 16, 2026 | 09:47 PM
Crime News: ‘मध्यरात्रीत एक, दोन नव्हे तर…’; उंब्रजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांसमोर आव्हान
Follow Us
Follow Us:

उंब्रज येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
पाटण तिकाटणे परिसरात सोमवारी फोडली 6 दुकाने
उंब्रज पोलिसांसमोर उभे राहिले आहे मोठे आव्हान

उंब्रज: कराड तालुक्यातील उंब्रज येथे चोरट्यांचाधुमाकूळ सुरूच असून पाटण तिकाटणे परिसरात सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली. पहाटे एक ते दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी सुमारे तासभर या परिसरात वावरत दुकाने फोडून रोख रक्कम, मोबाईल अ‍ॅक्सेसरीज व इतर साहित्य लंपास (Crime News)  केले. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून उंब्रज पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज-कराड महामार्गलगत असलेल्या पाटण तिकाटणे परिसरात चोरट्यांनी प्रथम ओम मेडिकलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. किशोर शिंदे यांच्या मालकीच्या या दुकानातून सुमारे दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. त्यानंतर शेजारील प्रणव माने यांच्या सिद्धनाथ मेडिकलचे दोन कुलूप तोडून शटर उघडण्यात आले. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करत चोरट्यांनी तीन ते चार हजार रुपयांची चिल्लर तसेच काही किरकोळ साहित्य चोरून नेले.

याच परिसरातील अवी रजपूत यांच्या मालकीच्या जी मोबाईल शॉपीचे कुलूप तोडून मोबाईल अ‍ॅक्सेसरीज व काही मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. तर शेजारील श्री गजानन मेडिकलचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र त्यात ते अपयशी ठरले. तसेच रुद्र पान शॉप आणि पायोनियर मेडिकलचीही कुलपे तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बेपत्ता विद्यार्थिनीचा विहिरीत सापडला मृतदेह; बारामती तालुक्यात खळबळ

दरम्यान या संपूर्ण घटनेदरम्यान तिघे चोरटे परिसरात वावरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. विशेष म्हणजे, पाटण तिकाटणे परिसरात पूर्वी पोलिसांची नियमित रात्रगस्त असायची; मात्र अलीकडे ती बंद झाल्याने चोरट्यांनी याचाच फायदा घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

बेपत्ता विद्यार्थिनीचा विहिरीत सापडला मृतदेह

शारदानगर (ता. बारामती) येथील २१ वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह माळेगाव खुर्द–केव्हिके रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा दत्तात्रय मेमाणे (ह.मु. शारदानगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात धक्कादायक प्रकार! कॉलेज तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुणाच्या डोक्यात कोयता अडकला आणि…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा मेमाणे ही शिक्षण घेत असलेली तरुणी असून, ९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडली होती. मात्र दिवसभर उलटूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. ओळखीच्या ठिकाणी चौकशी तसेच मित्रमैत्रिणींशी संपर्क साधूनही तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही. अखेर तिचे वडील दत्तात्रय नामदेव मेमाणे (रा. शारदानगर) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली

Web Title: Thieves broke shops and robbed cash in umbraj at midnight crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • crime news
  • Police News
  • Umbraj

संबंधित बातम्या

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…
1

धक्कादायक ! मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; नराधमांनी धमकावून डांबलं अन् नंतर…

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
2

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
3

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
4

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.