Photo Credit- Team Navrashtra एकनाथ शिंदेंचे दिल्लीतून फोन टॅपिंग होत आहेत
मागील काही दिवसांपासून महायुतीत काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याचेही बोलले जात आहे. अनेकदा त्यांची नाराजी उघडपणे समोरही आली. असे सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांचे फोन दिल्लीतून टॅप केले जात असल्याची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीच हा खळबळजनक दावा केला आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत, असे शिंदेंना खात्रीने वाटते. दिल्लीच्या एजन्सी त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी आता झाली आहे,” अशी माहिती शिंदेंच्याच आमदाराने दिल्याचा खळबळजनक दावा ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे. शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती.
Pankaja Munde : राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे…; पंकजा मुंडेंचे
संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सरदार यासंदर्भात दावा केला आहे. “मुख्यमंत्री फडणवीस आता एकनाथ शिंदेंवर दबाव टाकत आहेत, कारण शिंदे यांच्याकडे सध्या काहीच उरलेले नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध आता जवळजवळ तुटले आहेत. परिणामी दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत.
याच दरम्यान, भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शिंदे यांच्या लोकांसोबत नियमित जनता दरबार घेण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाने यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारची अवस्था किती कमजोर आणि अनियंत्रित आहे, हे स्पष्ट होते. प्रशासन आणि जनतेच्या समस्यांकडे कुणाचं लक्ष नाही, याकडेही संजय राऊतांनी लक्ष वेधलं.
DeepSeek चॅटबॉटची क्रेझ वाढली, 140 देशांमध्ये गाठलं अव्वल स्थान! भारतातील
शिंदे गटाचे काही आमदार विमान प्रवासात भेटले आणि त्यांनी माहिती दिली, ज्यामुळे गोंधळ उडाला. शिंदे गटातील एक आमदार म्हणाला की, शिंदे अजूनही फडणवीस यांच्या अपमानामुळे दु:खी आहेत. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कालखंडात, शिंदे आणि फडणवीस यांचं नातं तणावपूर्ण होतं. आता, फडणवीस शिंदेकडून बदला घेत आहेत, कारण शिंदेंकडे सध्या कोणतेही महत्त्वाचे खाते नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शांनी शिंदे यांना आश्वासन दिलं होतं की, “तुम्हीच 2024 नंतर मुख्यमंत्री असाल, निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा,” पण शहा यांनी हे आश्वासन पाळले नाही आणि शिंदेंना धोका दिला, असा दावा राऊत यांनी केला. तसंच, शिंदे यांचा फोन टॅप होण्याचा संशय देखील त्यांच्या गटातील एका आमदाराने व्यक्त केला. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या दिशेने जात आहे, हे पाहणं महत्वाचं आहे. शेवटी राऊतांनी असं म्हटलं की भाजप कोणाचाही नाही. शिंदे गट आणि भाजप यांच्या प्रतिक्रियांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.