आधी घराची रेकी, मग कारवर गोळ्यांचा वर्षाव? टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील 2 संशयित मुंबई पोलिसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ जुहू परिसरातील पुष्पा नरसी पार्क येथे फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. तेथून कारने घरी परतत असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या कारवर गोळीबार केला. यावेळी परिसरात चाहत्यांची गर्दी होती. अचानक गोळीबार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हल्लेखोर डरपोक, कुठेतरी लपून बसतात अन्…; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
या हल्ल्यात टायगर श्रॉफला गोळी लागली नाही. मात्र, त्याचा वाहनचालक फिरदौस याच्या हाताला दुखापत झाली. तसेच घटनास्थळाजवळील आणखी एक व्यक्ती जखमी झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. टायगर श्रॉफ सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
1. फूल सिंह (वय १७) — हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील बडोदा थुथन येथील रहिवासी.
2. ऋतिक कुमार उर्फ रोशन (वय २२) — मूळचा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील पिपराई गावचा रहिवासी. सध्या अंधेरी पश्चिम, मुंबई येथे वास्तव्यास. रॅपिडो रायडर म्हणून काम करतो.
3. रेहान (वय १८) — हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील ईदगाह कॉलनी परिसरातील रहिवासी.
हल्लेखोरांनी गोळीबार करण्यापूर्वी टायगर श्रॉफच्या घरासह तो नियमित फुटबॉल खेळण्यासाठी जात असलेल्या मैदानाची रेकी करण्यात आली. अभिनेत्याच्या येण्या-जाण्याच्या वेळा, त्याच्या वाहनाचा मार्ग आणि परिसरातील सुरक्षाव्यवस्था यांची माहिती आरोपींनी आधीच गोळा केली होती का, याचा पोलीस तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफच्या हालचालींवर काही दिवसांपासून नजर ठेवण्यात आली होती, असा संशय व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांना टायगर कोणत्या वेळी फुटबॉल मैदानावर येतो आणि तेथून कधी बाहेर पडतो, याची पूर्वकल्पना होती का, याचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि संशयितांच्या प्रवासाच्या हालचालींचा आधार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काही संशयित गुजरातच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. राजस्थानमधील कोटा पोलिसांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र, संबंधित संशयितांचा प्रत्यक्ष हल्ल्यात किती सहभाग आहे, याबाबत अधिकृत तपासातूनच स्पष्टता येणार आहे.
टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. वांद्रे येथील कार्टर रोड परिसरातील त्याच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच अभिनेत्याच्या घराजवळील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार करण्यासाठी हल्लेखोरांनी गावठी पिस्तुलाचा वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक फॉरेन्सिक तपासात या शस्त्राबाबत काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे वृत्त आहे. मात्र, नेमके कोणते शस्त्र वापरण्यात आले, याबाबत अंतिम निष्कर्ष अधिकृत तपास अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
भरवस्तीत प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर गोळीबार झाल्याने मुंबईतील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले. हल्लेखोरांना शस्त्रे कोणी पुरवली, त्यांनी आधीपासून रेकी केली होती का आणि हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.
Ans: रविवारी, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा नरसी पार्कजवळ टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाला.
Ans: टायगर श्रॉफला गोळी लागलेली नाही आणि तो सुरक्षित आहे. मात्र, त्याचा वाहनचालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे.
Ans: बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमधून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. मात्र, पोलिसांकडून या दाव्याची अधिकृत पडताळणी सुरू आहे.






