खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. खंडाळा- म्हावशीच्या २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला गेला आहे.
त्यानुसार सोमवार दि. १९ ते २६ ऑक्टोंबर पर्यंत रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत सहाय्यक निंबधक सहकारी संस्था खंडाळा यांचे कार्यालयातील निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता दाखल अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. २७ रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया तर दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता वैध ठरलेल्या अर्जाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि.२८ ऑक्टोबर ते दि. १२ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत होणार आहे. आवश्यक वाटल्यात दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. दि. २४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्याच दिवशी विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहेत.
Gokul Milk Election: ‘गोकुळचे रंगा-बिल्ला’; कोल्हापुरच्या राजकारणात सोशल मीडियावर चिखलफेक!
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक डॉ प्रगती बागल काम पाहणार असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खंडाळ्याच्या सहाय्यक निबंध सौ.प्रीती काळे व वाईचे सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर काम पाहणार आहेत.






