Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: टोमॅटोच्या क्रेटवरून वाद विकोपाला; भाजी विक्रेत्याचा मृत्यू, चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Maharashtra crime : टोमॅटोच्या क्रेटवरून झालेला किरकोळ वाद विकोपाला गेल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वादादरम्यान झालेल्या मारहाणीत विक्रेत्याचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 03, 2026 | 04:22 PM
टोमॅटोच्या क्रेटवरून वाद विकोपाला; भाजी विक्रेत्याचा मृत्यू, चौघे अटकेत

टोमॅटोच्या क्रेटवरून वाद विकोपाला; भाजी विक्रेत्याचा मृत्यू, चौघे अटकेत

Follow Us
Follow Us:
  • टोमॅटोच्या क्रेटवरून वाद विकोपाला
  • भाजी विक्रेत्याचा मृत्यू
  • चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान मंदिराजवळ भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये टोमॅटोच्या क्रेटवरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होऊन एका भाजी विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भाजी मार्केटमध्ये दोन विक्रेत्यांमध्ये टोमॅटोच्या क्रेटवरून वाद झाला होता. वाद वाढल्यानंतर धीरज गुप्ता याने लोखंडी रॉडने संतोष लल्लन सिंह यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात संतोष सिंह गंभीर जखमी झाले.

Bihar Crime: आईने बॉयफ्रेंडलाच बनवलं जावई, पुढं घडलं भयानक, कुणाचा गेला जीव?

जखमी संतोष सिंह यांना प्रथम जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मीरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना 2 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

मृत संतोष सिंह यांचे भाऊ मनोज लल्लन सिंह यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नवघर पोलिसांनी धीरज गुप्ता, रोशन गुप्ता, राजन गुप्ता आणि अंजित गुप्ता या चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 105, 118(1), 115(2) आणि 352(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर भाजी मार्केट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान मीरा भाईंदर शहरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, शहरीकरण, स्थलांतर आणि वाढती वस्ती यामुळे कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान अधिक गंभीर बनले आहे. चोरी, घरफोडी, वाहन चोरी, मारहाण, आर्थिक फसवणूक, अमली पदार्थांची तस्करी आणि खूनासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, छेडछाड, फसवणूक आणि ऑनलाईन गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. रात्रीच्या वेळी काही भागांत गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांकडून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.

मीरा-भाईंदरमधील महामार्ग परिसर, निर्जन भाग, वाढत्या झोपडवस्त्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. काही प्रकरणांमध्ये टोळीयुद्ध, स्थानिक वाद, व्यावसायिक स्पर्धा आणि मालमत्ता व्यवहारांमधूनही गुन्हे घडत असल्याचे दिसून येते.

Madhyapradesh Crime: आधी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ५० हजारात सौदा, पेट्रोल टाकून जाळले; प्रियकरानेच केला घृणास्पद प्रकार!

Web Title: Tomato crate dispute vegetable seller death four arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • crime
  • mira bhayandar
  • police

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका
1

Mira Bhayandar Dahi Handi: ‘संस्कृतीची हंडी’ ते ‘मराठी हंडी’; मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा दणका

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.