Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरलेल्या दोन कार पुन्हा त्याच ठिकाणी, पोलीसही चक्रावले; नेमकं काय घडलं?

दोन दिवसांनी चोरी केलेल्या दोन्ही कार अज्ञातांनी पुन्हा त्याच ठिकाणी आणून लावल्याच्या घटना घडल्या मात्र सदर घटनेने शिक्रापूर पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 04, 2025 | 03:20 PM
चोरलेल्या दोन कार पुन्हा त्याच ठिकाणी, पोलीसही चक्रावले; नेमकं काय घडलं?

चोरलेल्या दोन कार पुन्हा त्याच ठिकाणी, पोलीसही चक्रावले; नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे संभाजीनगर व सोलापूरहून अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांच्या दोन कार शिक्रापूर येथील पोलीस बंदोबस्तात असलेल्या पार्किंगमधून चोरीला गेल्याच्या घटना घडली होती. याबाबत शिक्रापूर पोलिसांत कार चोरीबाबत गुन्हा दाखल झाला. दोन दिवसांनी चोरी केलेल्या दोन्ही कार अज्ञातांनी पुन्हा त्याच ठिकाणी आणून लावल्याच्या घटना घडल्या मात्र सदर घटनेने शिक्रापूर पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.

कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे १ जानेवारी रोजी संभाजीनगरहून पद्माकर हिवराळे हे त्यांच्या ताब्यातील एम एच २० एफ जि ७११६ या स्विफ्ट तर सोलापूरहून सुर्यकांत गायकवाड हे त्यांच्या ताब्यातील एम एच ४३ आर ६९३३ या इनोव्हा कारमधून आपल्या सहकाऱ्यांसमवेत आले होते. त्यांनी त्यांच्या कार शिक्रापूर येथील जित हॉटेल समोरील पार्किंगमध्ये लावल्या. येथून शासकीय बसने अभिवादन स्थळी गेले. दुपारच्या नंतर पुन्हा पार्किंगमध्ये आले त्यावेळी कार चालक पद्माकर हिवराळे व सुर्यकांत गायकवाड या दोघांना त्यांच्या कारची चावी त्यांच्या कमरेला नसल्याचे दिसल्याने त्या दोघांनी कारची पाहणी केली. दोन्ही कार चोरीला गेल्याचे समोर आले. याबाबत पद्माकर नामदेव हिवराळे (वय ३७ वर्षे रा. सहारा परिवर्तन सोसायटी जळगाव रोड संभाजीनगर) व सुर्यकांत मुकिंद गायकवाड (वय २८ वर्षे रा. गणेशनगर ता. सोलापूर जि. सोलापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

हे सुद्धा वाचा : Pune Crime : गुन्हे शाखेच्या युनिट एकची मोठी कारवाई; गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

चोरट्यांचा शोध सुरु

शिक्रापूर पोलिसांचे वेगवेगळे पथक परिसरातील सीसीटीव्ही तपासात कार चोरीचा तपास करत असताना ३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास सदर जित हॉटेल समोरील पार्किंगमध्ये दोन नंबर नसलेल्या कार उभ्या असल्याबाबत पोलिस स्टेशनमध्ये फोन आला. पोलीस पार्किंगकडे जाताच चक्रावून गेले. पोलीस ज्या कार चोरीचा तपास करत होते त्या दोन्ही कार तेथे उभ्या असल्याचे दिसले. तर पोलिसांनी दोन्ही कार ताब्यात घेतल्या. पोलिसांना अशा पद्धतीने चोरीची झलक दाखवणाऱ्या चोरट्यांचा पोलीस हवालदार गणेश करपे व बापू हाडगळे यांसह आदी पोलीस शोध घेत आहेत.

वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन चोरी

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शिरोली सुलतानपूर येथील जगदाळे मळा येथील वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने व रोख एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम अज्ञातांनी लंपास केली आहे. ही घटना सोमवार (३० डिसेंबर) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी वृद्ध दाम्पत्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून कानातील दागिने चोरट्यांनी ओरबडून नेले आहेत. डोक्याला जबर मारहाण लागल्याने त्यांना डोक्याला बारा व कानाला बारा टाके पडले आहेत. जिजाबाई तुकाराम आतकरी (वय ६५) असे जखमीचे नाव आहे.

Web Title: Two cars stolen by thieves have been found in shikrapur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur Crime
  • Shikrapur News

संबंधित बातम्या

Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद
1

Maval Crime News : चोरांना राहिला नाही कोणाचाच धाक? वडगाव मावळमध्ये चोरीच्या घटना CCTV मध्ये कैद

‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…
2

‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
3

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
4

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.