पुण्यात दोन मुलींवर अत्याचार (फोटो- istockphoto)
पुणे:शिवाजीनगर भागात किरकोळ वस्तूंची विक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित ४२ वर्षीय मुलींच्या आईने शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागातील चौकात प्लास्टिक पिशवी, पेन, तसेच फुले विक्री करण्याचे काम मुली करतात. दोघी चुलत बहिणी आहेत. पीडित मुली आणि त्यांचे कुटुंबीय फिरस्ते असून, ते किरकोळ वस्तुंची विक्री करुन उदरनिर्वाह करतात. या पीडित मुलींच्या मोठ्या बहिणीचा विवाह आरोपी अल्पवयीन मुलांच्या नात्यातील एका तरुणाशी झाला आहे. त्यामुळे मुली आरोपींना ओळखतात. १७ मार्च रोजी अल्पवयीन मुले शिवाजीनगरमध्ये आले. त्यांनी मुलींना बहिणीची भेट घालून देतो, असे सांगून दुचाकीवरून नेले. त्यावेळी आरोपी मुलांची आई तेथे होती. मुलींवर दोघांनी बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला. तसेच, अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
साताऱ्याच्या तरुणांकडून थायलंडमध्ये महिलेवर अत्याचार
महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य साताऱ्यातील दोन तरूणांनी केले आहे. साताऱ्यातील दोन तरुणांनी थायलंडमध्ये बीचवर २४ वर्षीय जर्मन महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरूण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आहेत. त्यांनी थायलंडमधील बीचवर २४ वर्षीय जर्मन महिलेवर सामूहिक अत्याचार केला आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरूंगात करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या घटनेमुळे सातारकऱ्यांची आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.
साताऱ्याच्या तरुणांकडून संतापजनक कृत्य; थायलंडमध्ये महिलेवर अत्याचार केला अन्…
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोन जण थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेले होते. थायलंड येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातील बाणताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयितांना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच साताऱ्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये देशाची मान शरमेनं खाली जाईल, असे कृत्य केले आहे.