संग्रहित फोटो
सातारा : महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य साताऱ्यातील दोन तरूणांनी केले आहे. साताऱ्यातील दोन तरुणांनी थायलंडमध्ये बीचवर २४ वर्षीय जर्मन महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरूण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आहेत. त्यांनी थायलंडमधील बीचवर २४ वर्षीय जर्मन महिलेवर सामूहिक अत्याचार केला आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरूंगात करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या घटनेमुळे सातारकऱ्यांची आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोन जण थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेले होते. थायलंड येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातील बाणताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयितांना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच साताऱ्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये देशाची मान शरमेनं खाली जाईल, असे कृत्य केले आहे.
कारेगावात लग्नाच्या आमिषाने महिलेवर वारंवार अत्याचार
कारेगाव (ता.शिरूर) येथील महिलेची तिच्या व्यवसायातून सुरजकुमार सिंग याच्यासोबत ओळख झाली. यानंतर सुरजकुमार याने महिलेशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपी सुरजकुमार याने महिलेला विविध ठिकाणी नेत वारंवार अत्याचार केला. इतकेच नाहीतर पीडित महिलेकडे साडे पाच लाखांची मागणी करत गंडाही घातला.