Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar Crime: सातबारावर नाव चढवण्यासाठी 20 हजारांची लाच; ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सावत्र बहिणीचे नाव सातबारावर वारस म्हणून नोंदवून फेरफार मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या द्वारली-ढोकळी येथील ग्राम महसूल अधिकारी ईश्वर जाधव यांना एसीबीच्या ठाणे पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 30, 2026 | 12:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सातबारावरील फेरफार मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी.
  • एसीबीने सापळा रचून ग्राम महसूल अधिकारी ईश्वर जाधव यांना रंगेहात पकडले.
  • आरोपीचा मोबाईल जप्त; हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.
उल्हासनगर: सावत्र बहिणीचे नाव सातबारावर चढवून फेरफार मंजूर करण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहात पकडले. द्वारली-ढोकळी येथील तलाठी कार्यालयात झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

शासकीय कामासाठी नागरिकांकडून लाच उकळणाऱ्या महसूल विभागातील एका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने शुक्रवारी रंगेहात पकडत मोठी कारवाई केली. ईश्वर बद्रीनाथ जाधव (वय ५६), ग्राम महसूल अधिकारी, द्वारली-ढोकळी, असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

Pune Crime : पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्…

तक्रारदाराच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या सावत्र बहिणीचे नाव वारस म्हणून सातबारावर नोंदवून फेरफार काढण्यासाठी जाधव यांनी स्वतःसाठी १० हजार रुपये आणि मंडल अधिकाऱ्यासाठी १० हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने २९ मे रोजी एसीबी ठाणे कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने तत्काळ सापळा रचला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी द्वारली येथील तलाठी कार्यालयात जाधव यांनी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना दुपारी रंगेहात पकडले. आरोपीकडून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांचा मोबाईल फोनही तपासासाठी ताब्यात घेण्यात आला आहे.

या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीच्या निवासस्थानी झडतीची कारवाईही सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक अनिल जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद जाधव, सुनील केदार, रेखा शिंदे या पथकाने ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

10 हजारांच्या खंडणीसाठी दोन सख्या भावांचा बळी; कुटुंबाचा पोलिसांवर गंभीर आरोप

उल्हासनगरात गोळीबारात दोन सख्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारातील आरोपीनी त्यांना आधी धमकी दिली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा बाहेर येत आहे. मृत घरातील सदस्यांनी आता आरोप केला आहे, तो म्हणजे पोलिसांनी तक्रार दिल्यावर दुर्लक्ष केल होत. आधी खंडणी मागण्यात आली नंतर धमकी देण्यात आली. तरी पण आमच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करण्यात आल. त्यामुळे या घटनेत उल्हासनगर पोलिसांवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; सहा साक्षीदारांनी नोंदवली साक्ष, आता…

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी अधिकाऱ्याचे नाव काय आहे?

    Ans: ईश्वर बद्रीनाथ जाधव (वय 56), ग्राम महसूल अधिकारी, द्वारली-ढोकळी.

  • Que: लाचेची रक्कम किती मागितली होती?

    Ans: स्वतःसाठी 10 हजार आणि मंडल अधिकाऱ्यासाठी 10 हजार, अशी एकूण 20 हजार रुपये.

  • Que: कारवाई कोणत्या यंत्रणेने केली?

    Ans: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे पथकाने सापळा रचून कारवाई केली.

Web Title: Ulhasnagar crime 20000 bribe to add name to 712 extract village revenue officer caught in acb trap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • ACB
  • crime
  • Ulhasnagar Hillline Police Station

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
4

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.