चपाती उशीरा मिळाली म्हणून नवरदेव भडकला, भर लग्न मंडपात केलं असं काही की… (फोटो सौजन्य-X)
लग्न म्हटलं की, दोन व्यक्ती, दोन कुटुंब एकत्र येतात.पण उत्तर प्रदेशात अशी एक घटना घडली की सर्वांना वाचून धक्काच बसेल. उत्तर प्रदेशातील चंदौली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नातील पाहुण्यांना उशीरा चपाती मिळाली म्हणून रागाच्या भरात नवरदेवाने लग्न मोडले. नवरदेव एवढ्यावरच थांबला नाही, त्याच रात्री त्याने दुसऱ्या तरुणींसोबत लग्नही केले. ही बाब नववधूला समजताच ती चक्रावून जाते.
अशा स्थितीत वधूने बुधवारी एसपी आदित्य लंघे यांना अर्ज देऊन या प्रकरणाची तक्रार केली आहे. रडत नवरीने न्यायासाठी याचना केली. अशा स्थितीत पोलिस कारवाईत आले आणि त्यानंतर शुक्रवारी पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांमध्ये समजूत काढण्यात आली.
हे प्रकरण जिल्ह्यातील मुगलसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंडस्ट्रियल टाऊन चौकी परिसरातील हमीदपूरचे आहे. या घटनेबाबत बोलताना पीडित वधूने सांगितले की, सात महिन्यांपूर्वी त्याच गावातील महताब नावाच्या व्यक्तीसोबत तिचे लग्न ठरले होते. 22 डिसेंबरला हे लग्न होणार होते. कुटुंबीयांनी लग्नाची सर्व तयारी केली होती. ठरल्याप्रमाणे मिरवणूक आली. सर्वांचे स्वागत करण्यात आले. मात्र, मेजवानीच्या वेळी एका पाहुण्याने चपाती उशिरा मिळत असल्याचे सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे ऐकून इतर लोकही संतापले.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, घरातील सदस्य सर्वांना समजावून सांगत होते पण ते मान्य होत नव्हते. यामुळे वरालाही राग आला आणि तेथून निघून गेला.नवरदेव गेल्यानंतर लग्नाची मिरवणूकही तिथून निघाली. वधूचा आरोप आहे की त्याच रात्री वराचे लग्न गावातील एका नातेवाईकाच्या मुलीशी झाले.
त्याचवेळी वधू पक्षात बसलेली पीडिता वाट पाहत राहिली. या घटनेनंतर वधूचे कुटुंब संतप्त आणि दु:खी आहे. त्यांनी एसपी कार्यालय गाठून न्यायाची याचना केली. लग्नाच्या वरातीत दोनशे लोक आले होते, असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यांच्या पोटापाण्यासाठी खूप पैसा खर्च झाला आहे. याशिवाय दीड लाख रुपये हुंडाही दिला होता. एकूण ६ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, तक्रार आल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोड झाली आहे.