वनराज आंदेकर हत्या प्रकरण (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुण्यामध्ये माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची निर्घुण हत्या करण्यात आली. वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आला. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले. सख्ख्या बहिणींनी ही भावाला मारण्याची सुपारी दिल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी बहिणींना आणि मेहुण्याला अटक केली. त्यानंतर त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र पुणे पोलिसांनी या प्रकरणात ताम्हिणी घाटाततून १३ जणांना अटक केली आहे.
वनराज आंदेकर यांची गोळीबार करून हत्या केलेल्या आरोपींनी ताम्हिणी घाटात तळ ठोकला होता. मात्र पुणे पोलिसांनी अगदी शिताफीने ताम्हिणी घाटात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणात गंभीरतेने लक्ष घातल्याचे पाहायला मिळत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत.
पुण्यातील नाना पेठेत १४ ते १५ हल्लेखोरानी दुचाकीवरून येत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला आहे. वनराज आंदेकर यांच्या गोळीबार सुरू केला. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगांवर धावून गेले. आंदेकर यांना एकही गोळी लागली नाही. मात्र धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्यात आले. त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे.
सख्या बहिणी ठरल्या वैरी
आरोपी संजीवनी आणि तिचा पती जयंत कोमकर यांचा पोलीस ठाण्यामध्ये वाद झाला होता. स्टॉलवरुन त्यांची आकाश परदेशी याच्यासोबत बाचाबाची झाली होती. हा वाद सोडवण्यासाठी वनराज आंदेकर आणि चुलत भाऊ शिवम यांनी मध्यस्थी केली होती. यावेळी पोलिसांसमोरच तू आमच्या दुकानावर कारवाई करण्यास सांगितले आहे. आमच्या पोटावर पाय दिला आहे. तुला आज पोरं बोलावून ठोकणार…, अशी फिर्याद देण्यात आली आहे. वनराज यांचे वडील सुर्यकांत आंदेकर यांनी या हत्येच्या प्रकरणामध्ये फिर्याद दिली आहे.
वनराज आंदेकर हे नान पेठेमध्ये उभे होते. यावेळी आरोपींनी सुपारी देऊन मुलांना त्यांची हत्या करण्यासाठी पाठवले. रात्री नऊच्या सुमारास दुचाकीवरुन मुलं आली. त्यांनी थेट वनराज यांच्यावर पिस्तुल रोखत गोळीबार केला. त्यानंतर वनराज व शिवम पळून जात होते. मात्र त्यांना गाठत कोयत्याने वार करण्यात आला. पाच फायरिंग आणि कोयत्याने वार करण्यात आले. यावेळी आरोपी गॅलरीमधून मारा त्याला सोडून नका…अशी चिथावणी देत असल्याचे फिर्यादीमध्ये सांगण्यात आले आहे.