ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी(फोटो-सोशल मीडिया)
Josh Hazlewood gets healthy : २०२६ च्या टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पूर्ण तंदुरुस्त झाला आहे. तो आता बिग बॅश लीग (बीबीएल) २०२५-२६ हंगामाच्या उर्वरित कालावधीसाठी सिडनी सिक्सर्समध्ये सामील झाल्यानंतर हेझलवूड स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यास सज्ज झाला आहे, या संघात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला पूरक करारबद्ध खेळाडू म्हणून संघात सामील करण्यात आले आहे. तो स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना दिसणार आहे. बिग बॅश लीगमधील पूरक करारांमुळे क्लब क्रिकेट ऑस्ट्रेलिया-करारबद्ध खेळाडूंना करारबद्ध करू शकतात ज्यांना त्यांच्या राष्ट्रीय संघातील वचनबद्धतेमुळे मर्यादित उपलब्धता देखील अपेक्षित आहे.
हेही वाचा : ICC T20 Ranking : टी-20 क्रमवारीत दीप्ती शर्माला फटका! ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पहिल्या क्रमांकावर मारली बाजी
सिडनी सिक्सर्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले आहे की, “आम्ही ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचे बीबीएल १५ साठी पूरक करारबद्ध खेळाडू म्हणून स्वागत करण्यास उत्सुक आहोत.”
जोश हेझलवुड आतापर्यंत फक्त बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना १९ सामन्यांमध्ये ८.५० च्या सरासरीने १७ बळी घेतले आहेत. तो शेवटचा २०१९/२० हंगामामध्ये खेळला होता, यावेळी त्याने पाच सामन्यांमध्ये १२ बळी टिपले होते. त्याची अचूकता, उसळी आणि सातत्य यामुळे जोश हेझलवुडने जागतिक क्रिकेटमधील आघाडीच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाला दुखापतींचा मोठा इतिहास राहिला आहे. अलिकडच्या अॅशेस कसोटी मालिकेदरम्यान, हॅझलवुडला हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते. त्या धक्क्यातून सावरताना, त्याला अॅकिलीस टेंडन दुखापत देखील झाली होती, ज्यामुळे त्याचे पुनरागमन अधिकच लांबणीवर पडले. सुरुवातीला हेझलवुडला अॅशेस मालिकेत सामील करण्यात आले होते. परंतु, तो पहिल्या दोन सामन्यांसाठी पूर्णपणे बरा होऊ शकला नव्हता नाही. त्यानंतर त्याला सोडण्यात आले होते.
हेझलवूड या अनुभवी वेगवान गोलंदाजाचा आगामी टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात देखील त्याला सामील करण्यात आले आहे. ज्यामुळे राष्ट्रीय संघासाठी त्याचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. हेझलवूडच्या पुनरागमनामुळे सिडनी सिक्सर्स संघाला अधिक मजबूती प्राप्त झाली आहे.






