Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim District Courtचा ऐतिहासिक निकाल; १५ वर्षांपूर्वीच्या कस्टोडियल डेथ प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप

Washim District Court,: सीआयडीच्या पथकाने ३४ दिवस सखोल तपास करून दोषी पोलिसांवर खुनाच्या गुन्ह्यासह विशेष अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. अखेर तब्बल १५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या प्रदीर्घ कायदेशीर कालावधीनंतर पीडित कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 03, 2026 | 10:49 AM
Washim District Court, Custodial Death Case, 9 Police Officers Life Sentence

Washim District Court, Custodial Death Case, 9 Police Officers Life Sentence

Follow Us
Follow Us:
  • पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत संशयित तरुणाचा मृत्यू
  • महादेव माणिक धाडे आणि त्यांच्या इतर ८ कर्मचाऱ्यांकडून पोलिस कोठडीतील तरुणाला बेदम मारहाण, मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू
  • ५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या प्रदीर्घ कायदेशीर कालावधीनंतर ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा
 

Washim District Court News: वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला. २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल ९ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून, या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

असे आहे प्रकरण

हे प्रकरण ९ मे २०११ रोजी घडले होते. रिसोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी (ठाणेदार) महादेव माणिक धाडे आणि त्यांच्या इतर ८ कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या वाढोणा येथील पारधी वस्तीवर छापा टाकला होता. एका चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून पोलिसांनी बेग्या पवार या तरुणाला ताब्यात घेतले होते. चोरीचा गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी बेग्याला पोलिस कोठडीत बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीमुळे दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १० मे २०११ रोजी बेग्या पवारचा कोठडीतच मृत्यू झाला.

बिग बाॅस फेम तान्या मित्तलच्या अडचणींमध्ये वाढ, सोशल मिडिया इन्फ्लुएंसरने लावले गंभीर आरोप

सीआयडीचा तपास आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा

या मृत्यूमुळे निर्माण झालेला तणाव पाहता शासनाने या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवला होता, सीआयडीच्या पथकाने ३४ दिवस सखोल तपास करून दोषी पोलिसांवर खुनाच्या गुन्ह्यासह विशेष अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. अखेर तब्बल १५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या प्रदीर्घ कायदेशीर कालावधीनंतर पीडित कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.

केवळ ‘पारधी’ असल्याने अडकवण्याचा प्रयत्न

मृत बेग्या पवार याच्या आईने निकालानंतर भावूक होत प्रतिक्रिया दिली. माझ्या मुलावर यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता किंवा त्याने साधा कोणताही गुन्हा केला नव्हता, केवळ तो ‘पारधी’ समाजाचा असल्याच्या पूर्वग्रहातून पोलिसांनी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याचा जीव घेतला, अस सांगत त्यांनी टाहो फोडला. न्याय मिळाल्यानंतर बेग्याच्या वृद्ध आई-वडिलांनी समाधान व्यक्त करत सीआयडी आणि सरकारी वकिलांचे आभार मानले,.

न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ झाला

या प्रकरणात पीडित कुटुंबाची बाजू मांडणारे सरकारी वकील श्रीराम काळ यांनी सांगितले की, हा निकाल अत्यंत ऐतिहासिक आणि कायद्याचे राज्य असल्याचे सिद्ध करणारा आहे.

Ketan Agrawal Murder Case : पुण्यातील ‘या’ भागात केला गेला केतनला ढकलण्याचा सराव; सियाच्या सोबतीने स्पॉट पंचनामा

‘ते’ ९ पोलिस अधिकारी
महादेव माणिक धांडे (तात्कालीन ठाणेदार)
मदन केशव पवार
शिवाजी नामदेव खिल्लारी
पंजाब माणिकराव पाटकर
रमेश सीताराम पवार
प्रकाश हिरालाल तारम
नागोराव भगवान खांडके
अशोक निवृत्ती वैद्य
बसंत कणिरान

 

Web Title: Washim district court verdict custodial death case 9 police officers life imprisonment1269505

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • Court Decision
  • crime news
  • Maharashtra Police
  • Washim Crime News

संबंधित बातम्या

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण
1

Washim News: ‘त्या’ शिक्षकाला दोन दिवसाचा पीसीआर; काटी जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी दुष्कृत्याचे प्रकरण

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
2

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
3

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
4

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.