Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू

Odisha News : कलिंगड खाऊन आणखी एका कुटुंबातील सदस्यांची प्रकृती ढासळली आणि यात कुटुंबातील एका सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कलिंगडात नक्की काय होते आणि हा मृत्यू खरंच कलिंगडामुळे झाला का याचा शोध घेतला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2026 | 11:19 AM
कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू

कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती बिघडली; चिमुकल्याचा मृत्यू, ५ जणांवर उपचार सुरू

Follow Us
Follow Us:
  • कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील अनेक सदस्यांची प्रकृती अचानक बिघडली.
  • उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीमुळे सर्वांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
  • उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
मुंबईत घडलेल्या कलिंगड प्रकरणाला पूर्णविराम मिळत असतानाच देशात पुन्हा एकदा अशीच घटना पुन्हा घडून आली आहे. ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातून ही घटना समोर येत असून यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील अन्य सदस्यांचाही प्रकृती ढासळल्याचे वृत्त आहे. या घटनेने फक्त कुटुबांलाच नाही संपूर्ण देशाला पुन्हा हादरवलं आणि कलिंगडाविषयीची भिती आता पुन्हा एकदा लोकांमध्ये पसरु लागली आहे.

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रपारा जिल्ह्यातील पट्टामुंडाई ब्लॉकमधील कुपुनी गावातील एका कुटुंबासोबत ही घटना घडली. गुरुवारी रात्री त्यांनी कलिंगडाचे सेवन केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होताच सर्वांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या. यामुळे त्यांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या, त्यांनी उल्टी होऊ लागली आणि मग थोड्या वेळानेच त्यांना जुलाब होऊ लागले. पाहता पाहताच कुटुंबातील ६ लोक आजारी पडले. त्यांची अवस्था इतकी बिघडली की त्यांना केंद्रपाड्यातील मुख्य रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील दोघांची प्रकृती अधिक बिकट झाल्याने त्यांना कटकला पाठवण्यात आले.

दरम्यान उपचारावेळी कुटुंबातील लहान मुलगा स्वाधीन सेनापति मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबात शोककळा पसरली आणि दु:खाचे वातावरण निर्माण झाले. एका कलिंगडामुळे इतकं सर्व होऊ शकतं याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.

केंद्रपाडा जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर अंबिका प्रसाद यांनी सांगतले की, कुटुंबातील सदस्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होत होता. प्राथमिक तपासणीत हे अन्न विषबाधेचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुटुंबातील अन्य सदस्यांवर उपचार सुरु असून बाकी सर्वांची स्थिती आता स्थिर होत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागा सतर्क झाला असून कलिंगडात नक्की असे काय होते आणि खरंच विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे का याचा शोध घेतला जात आहे.

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

दरम्यान देशाच्या अनेक भागांतून अशा घटना मागील काही काळापासून समोर आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई, मध्य प्रदेशातील श्योपूर आणि छत्तीसगडमधील घुरकोट शहरांचा समावेश आहे. या सलग घटनांमुळे आता अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Web Title: Watermelon food poisoning odisha child death family hospitalised crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • crime news
  • Odisha

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.