Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) चौघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईत २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 30, 2026 | 08:33 AM
व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • पोलिसांनी २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त केले असून त्याची किंमत २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये आहे.
  • अंबरग्रीससह वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
  • या प्रकरणी चौघांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथे व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी शनिवारी संध्याकाळी ६.२० वाजण्याच्या सुमारास केली. या कारवाईत २ कोटी ३७ लाख ३० हजार किंमतीच्या २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) ४ जणांना ताब्यात घेत एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

सासवडला पुन्हा तीन मेडिकल दुकाने फोडली, पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; कोम्बिंग ऑपरेशन सुरु

पणदूर ते कडावल जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत संकेत संतोष चव्हाण (वय- २६ वर्षे, रा. रवळनाथनगर, ओरोस मूळ रा. निरूखे, ता. कुडाळ), महेश लक्ष्मण रेवणकर (वय-३५ वर्षे, सध्या रा. कुवारबांव-रत्नागिरी, मूळ रा. रेवंडी, ता.मालवण), अमेय पुंडलिक देसाई (वय-३१ वर्षे, रा. ओरोस रवळनाथ नगर, ता. कुडाळ) आणि अमित अरूण अणावकर (वय ३९ वर्षे, रा. अणाव, ता. कुडाळ) यांना शीताफीने ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून २ कोटी ३७ लाख ३० हजार किंमतीच्या २ किलो ३७३ ग्रॅम वजनाच्या प्रतिबंधीत व्हेल माशाच्या उलटीसह (अंबरग्रीस) पदार्थ आणि या गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने असा एकूण २ कोटी ४६ लाख किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून कुडाळ पोलीस ठाणे येथे त्यांच्या विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४२, ४३, ४४, ४८, ५१ प्रमाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

पत्नीच्या प्रियकराला चाकूने भोसकून संपवलं; पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावातील थरार

सदरची कारवाई मोहन दहिकर, (पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग), नयोमी साटम (अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग), दीपक शेलार (परि. पोलीस उपअधीक्षक सिंधुदुर्ग) यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, एचसी विल्सन डिसोजा, आशीष जामदार, पीसी अमर कांडर यांच्या पथकाने केलेली आहे.

Web Title: Whale vomit smuggling busted in sindhudurg four held with ambergris worth rs 2 crore 46 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल
1

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

सासवडला पुन्हा तीन मेडिकल दुकाने फोडली, पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; कोम्बिंग ऑपरेशन सुरु
2

सासवडला पुन्हा तीन मेडिकल दुकाने फोडली, पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; कोम्बिंग ऑपरेशन सुरु

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”
3

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”

पत्नीच्या प्रियकराला चाकूने भोसकून संपवलं; पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावातील थरार
4

पत्नीच्या प्रियकराला चाकूने भोसकून संपवलं; पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावातील थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.