गोव्यात एका चार वर्षाच्या मुलाच्या हत्येच्या घटनेनं सध्या सगळीकडे खळबळ(4 year boy killed by his mother in goa) उडाली आहे. या मुलाची हत्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तिनं केली नसून त्याच्या जन्मदात्या आईनं केली आहे. सुचना सेठ (uchana Seth) असं या महिलेचं नाव असुन अत्यंत निदर्यपणे तिनं तिच्या मुलाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. सध्या गोवा पोलिसांनी तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक केली असून या प्रकरणी चौकशी केली जातेय. मात्र, मुलाची हत्या करण्याचं कारण ऐकून तुम्हीही हादरुन जालं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती तिच्या पतिसोबत घटस्फोट घेणार असून आपल्या मुलाला तिच्या पतीला भेटू नये म्हणून हे भयानक पाऊल उचलले आहे. स्वत:च्या पोटच्या मुलाची हत्या आई सुचना सेठ नेमकी कोण आहे जाणून घ्या.
[read_also content=”आमिर खानच्या लेकीच्या लग्नविधींना सुरुवात, इराच्या हाताला लागली नुपूरच्या नावाची मेहंदी! https://www.navarashtra.com/movies/aamir-khan-daughter-ira-khan-marriage-function-started-in-udaipur-photos-of-mehendi-ceremony-goes-viral-nrps-496391.html”]
गोव्यात चार वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी त्याची आई सुचना सेठला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका पिशवीत घेऊन गोव्याहून कर्नाटकला जात असताना गोवा पोलिसांनी तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक केली.
सूचना सेठच्या लिंक्डइन पेजनुसार, ती एआय स्टार्टअप ‘माइंडफुल एआय लॅब’ची संस्थापक आणि सीईओ आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये AI Ethics मधील 100 सर्वात हुशार महिलांमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. ती AI नीतिशास्त्रातील तज्ञ आणि डेटा सायंटिस्ट सुद्धा आहे. सूचना सेठने हार्वर्ड विद्यापीठासह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये सहसंशोधक म्हणून काम केलं आहे.
सुचना सेठ आपल्या मुलासह गोव्यात आली होती. 6 जानेवारीपासून गोव्यातील कँडोलिम भागातील सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये राहत होती. काही दिवस तिथे राहिल्यानंतर सुचना सेठने अपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, तिला काही कामासाठी बंगळुरूला जायचे आहे आणि त्यांनी त्यासाठी टॅक्सीची व्यवस्था करावी. यावर कर्मचार्यांनी महिलेला टॅक्सीने जाणं अधिक महागात पडणार असल्याने टॅक्सीऐवजी फ्लाइटने जाण्याचा सल्ला दिला, मात्र महिलेने टॅक्सीनेच जाण्याचा आग्रह धरला.
यावर कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची व्यवस्था केली आणि ती महिला ८ जानेवारीला सकाळी बेंगळुरूला रवाना झाली. महिला निघून गेल्यानंतर कर्मचारी खोली साफ करण्यासाठी गेले असता त्यांना खोलीत रक्ताचे डाग दिसले. याबाबत त्यांनी लगेत पोलिसांना कळवलं. तसेच, कर्मचार्यांनी पोलिसांना असेही सांगितले की ही महिला बंगळुरूला निघाली तेव्हा तिचा चार वर्षांचा मुलगा तिच्यासोबत नव्हता आणि तिने एक मोठी बॅग सोबत घेतली होती. त्यावर पोलिसांनी सुचना सेठला फोन करुन खोलीतील रक्ताचे डाग आणि मुलाबाबत विचारणा केली. यावर तिने सांगितले की, तिच्या मासिक पाळीमुळे ते डाग पडले होते आणि तिचा मुलगा तिच्या मित्राच्या घरी आहे, परंतु पोलिसांनी मित्राच्या घराचा पत्ता मागितला असता तो पत्ताही तपासात खोटा असल्याचं आढळलं.
पोलिसांना संशय येताच त्यांनी महिलेला घेऊन जाणाऱ्या टॅक्सी चालकाला बोलावून जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. तसेच तिच्या मागावर गोवा पोलिसांचं एक पथकही पाठवण्यात आलं. दरम्यान, पोलिसांनी तिची बॅग तपासली असता त्यात तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. पतीला भेटू नये म्हणून तिने आपल्या मुलाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. महिलेचा तिच्या पतीकडून घटस्फोटाचा खटला सुरू आहे. पोलिसांनी महिलेच्या पतीलाही या घटनेची माहिती दिली असून तो सध्या इंडोनेशियातील जकार्ता येथे आहे.






