डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार (Photo : Molestation)
बुटीबोरी : विधवा महिलेची दोन्ही मुले कामानिमित्त बाहेर गेली असल्याने ती घरी एकटीच झोपली होती. याच संधीचा फायदा घेऊन एका नराधमाने मध्यरात्रीच्या सुमारास तिचा विनयभंग केला. ही घटना बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.27) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक अग्रवाल यांच्या आदेशानुसार, आरोपी प्रशांत हरिश्चंद्र सोनवने (वय 42) याला तात्काळ अटक करून 24 तासांत न्यायालयासमोर हजर केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील पीडित महिला ही विधवा असून, तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून ती आणि तिचे दोन मुले हे खाजगी कामे करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. घटनेच्या दिवशी पीडित महिलेची दोन्ही मुले ही आपले खाजगी कामानिमित्त बाहेर गेले असल्याने ती घरी एकटीच होती. नेहमीप्रमाणे तिने जेवण केल्यानंतर घरातील लाईट बंद करून आतील खोलीतील लाकडी खाटेवर झोपली होती. त्यावेळी तिच्या घराचा दरवाजा उघडा होता.
नेमकी ही संधी साधून एक आरोपी मध्यरात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास तिच्या घरात शिरला आणि ती झोपलेल्या अवस्थेत असताना तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. या दरम्यान तिला जाग आल्याने ती घाबरली आणि जोरात आरडाओरड केली. त्यावेळी परिसरातील काहींनी तिचा आरडाओरडा ऐकून तिच्या घराकडे धाव घेतली आणि त्या नराधमास घरातून हाकलून लावले. पीडित महिलेने बुटीबोरी पोलिस ठाणे गाठून पोलिसांना आपबीती सांगितली.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलिस अधिकारी अग्रवाल यांनी दिलेल्या आदेशावरून आरोपी प्रशांतविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला. ठाणेदार प्रताप भोसले यांचे मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध तात्काळ दोषारोप तयार केले. या पथकाने आरोपीस ताब्यात घेत त्याच्याविरूद्ध 24 तासाच्या आत सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र तयार केले.