शिडीवरून पडून वायरमनचा मृत्यू (फोटो- istockphoto)
पुणे: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या टेरेसवर इलेक्ट्रिकचे (लाईट) काम करताना शिडीवरून खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वडगाव शेरी येथील सैनीकवाडीमधील वृद्धावन नगर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. युसूफ शेख (वय ४७, रा. कोंढवा) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी इलेक्ट्रिक्स ठेकेदारावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युसूफ यांच्या पत्नीने तक्रार दिली आहे. ४ जानेवारी दुपारी ही घटना घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, युसूफ शेख हे लाईट फिटींगचे काम करतात. दरम्यान, वृद्धावन नगर येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर लाईटचे काम सुरू होते. हे काम युसूफ शेख यांच्याकडून करून घेतले जात होते. ठेकेदाराने त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. मात्र, काम करताना कामगारांच्या सुरक्षिततेची पुरेषी काळजी घेतली गेली नाही. युसूफ हे शिडीवर उभा राहून काम करत असताना ते शिडीवरून खाली पडले. यात डोक्याच्या पाठिमागील बाजूस गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदाराने कामगारांच्या जिवीताची व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य ती साधने न पुरविता त्यांच्याकडून कामकरून घेतले. काम करताना त्यांचा शिडीवरून खाली पडून मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला ठेकेदार जबाबदार असल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची तोडफोड
पुण्यातील भारती हॉस्पिटलमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
डाॅ. अंकिता अर्पित ग्रोवर (वय 36) यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्याच्या घटनेवरून संबंधित नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना कशी घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील भारती हॉस्पिटलमध्ये तेजराज जैन (वय ८६) यांचे उपचारादरम्यान मंगळवारी (७ जानेवारी) मृत्यू झाला. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे जैन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
Pune Crime: पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून युवकाने उचलले टोकाचे पाऊल
तोडफोड आणि धक्काबुक्कीची घटना
नातेवाईकांनी बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात सुरक्षारक्षक तृप्ती लोखंडे, श्रीदेवी डोईफोडे, निर्मला लष्कर, तसेच कर्मचारी सुनील दाते, अतुल शिंदे, चैतन्य दधस, प्रशांत ओव्हाळ यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यावेळी त्यांनी लाकडी स्टूल उचलून केबिनच्या काचांवर फेकून मारला.