पती प्रेयसीसोबत दिसताच पत्नीचा पारा चढला; दोघांना चांगलाच चोपला, महिलेचा हात फ्रॅक्चर तर पती...
नागपूर : विवाहित पुरुष अथवा महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यातून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारखे गुन्हे देखील घडताना दिसत आहे. नागपुरात अशीच एक घटना घडली. इथे मात्र एका महिलेने तिच्या पतीसह त्याच्या प्रेयसीला चांगलाच चोप दिला. विवाहित असूनही दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या पुरुषाला पत्नीच्या कुटुंबाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
पती प्रेयसीसोबत दिसताच पत्नीचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर पत्नीसह तिच्या कुटुंबियांकडून मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात प्रेयसीचा हात फॅक्चर झाला असून, पुरुषही जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५५ वर्षीय राजेंद्र शेती करतात. विवाहित असूनही अर्पण नावाच्या महिलेसोबत त्यांचे प्रेमसंबंध होते. ते आपला बहुतांश वेळ तिच्यासोबत घालवत असल्यामुळे त्यांची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य नाराज होते. अशातच, राजेंद्र प्रेयसी अर्पणसोबत असल्याचे पत्नीच्या कुटुंबीयांना समजले.
तेव्हा राजेंद्र यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी घोगली चौकात बोलावून राजेंद्रला जाब विचारणे सुरू केले. प्रकरण तापले आणि पत्नीच्या कुटुंबीयांनी राजेंद्रसह त्याच्या प्रेयसीला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत काठीचा वापर करण्यात आल्याने अर्पणचा हात मोडला.
दोघांनाही नागपुरातील रुग्णालयात दाखल
अखेर जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राजेंद्र यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून एकाचा खून
दुसऱ्या एका घटनेत, चंदननगर भागात चुलतीला आय लव्ह यू म्हणाल्याचा रागातून तरुणाचा दोघांनी हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. चंदननगर येथील भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हेदेखील वाचा : नर्सिंग होममध्ये नर्सचा मृतदेह लटकलेला अवस्थेत, कुटुंबीयांनी केला लैंगिक अत्याचार आणि हत्येचा आरोप; नेमकं प्रकरण काय?