Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेचा मोबाईल हॅक केला अन् 1.34 लाखांना गंडा घातला; परस्पर पैसे काढत गेला नंतर…

गेल्या दोन वर्षांपासून मुंब्रा परिसरात कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतात. निखत यांचे डीसीबी बँकेत, तर त्यांचे पती अब्दुल खालीद शेख यांचे अॅक्सिस बँकेत खाते आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 21, 2026 | 12:34 PM
महिलेचा मोबाईल हॅक केला अन् दीड लाखांना गंडा घातला; परस्पर पैसे काढत गेला नंतर...

महिलेचा मोबाईल हॅक केला अन् दीड लाखांना गंडा घातला; परस्पर पैसे काढत गेला नंतर...

Follow Us
Follow Us:

ठाणे : मुंब्रा येथे एका सुशिक्षित महिलेचा मोबाईल हॅक करून सायबर भामट्यांनी तिला आणि तिच्या पतीला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दोघांच्या बँक खात्यांमधून तब्बल १ लाख ३४ हजार रुपये ऑनलाईन लांबवले आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदवल्यानंतर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखत अब्दुल खालीद शेख (वय ३०, रा. मुंब्रा-कौसा) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. बी. कॉमचे शिक्षण पूर्ण केलेल्या निखत या एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्या गेल्या दोन वर्षांपासून मुंब्रा परिसरात कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतात. निखत यांचे डीसीबी बँकेत, तर त्यांचे पती अब्दुल खालीद शेख यांचे अॅक्सिस बँकेत खाते आहे. १ लाख ३४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाईल अचानक झाला अपडेट आणि रिबूट

२७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास निखत यांचा मोबाईल अचानक ऑटोमॅटिक अपडेट झाला आणि रिबूट (बंद होऊन चालू) झाला. सुमारे एका तासानंतर रात्री साडेआठच्या सुमारास फोन सुरू झाला, तेव्हा फोनमधील सर्व अॅप्लिकेशन्स गायब झाले होते. त्यामुळे निखत यांनी सर्व अॅप्स पुन्हा डाउनलोड केले. दुसऱ्या दिवशी निखत यांच्या बहिणीने रिचार्जसाठी पैसे मागितले.

बॅलेन्स तपासला अन्…

सायंकाळी साडेचार वाजता बँक खात्याचा बॅलन्स तपासला असता, त्यांच्या खात्यातून ८८ हजार रुपये परस्पर वळते झाल्याचे उघडकीस आले. निखत यांनी गुगल पेची हिस्ट्री तपासली असता, ७० हजार रुपये ‘बिकाश पासवान’ नावाच्या व्यक्तीच्या खात्यात, तर १८ हजार रुपये त्यांच्या पतीच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते. तसेच ४० हजार रुपयांचे एक ट्रान्झेंक्शन फेल झाले होते.

पोलिसात गुन्हा दाखल

या प्रकारानंतर त्यांनी तातडीने पतीच्या अॅक्सिस बँकेच्या खात्याची माहिती तपासली. सायबर चोरांनी त्यांच्या पतीलाही सोडले नव्हते. पतीच्या खात्यातूनही ६४ हजार रुपये भामट्यांनी उडवले होते. यामध्ये ५० हजार रुपये ‘सत्यम मिश्रा’ आणि १४ हजार रुपये ‘शेख रुखसार इम्तियाज’ नावाच्या व्यक्तींच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते. या खात्यावरूनही दोन व्यवहार रद्द झाले होते. भामट्यांनी मोबाईल हॅक करून एकूण १ लाख ३४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सायबर सेलच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.

रावेतमधील गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; बिश्नोई गँगच्या तीन जणांना उत्तराखंडमधून पकडले

Web Title: Woman mobile phone hacked fraud of 1 and half lakhs incident in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: आशुतोष रांका, सौरव दास यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई
2

राज्य सरकारी विभागांत मोठा घोटाळा; तब्बल 700 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी चौघांना अटक, CBI ची कारवाई

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?
3

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात
4

Nashik Crime : नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला, दोन संशयित ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.