प्लास्टिकच्या पिशवीत सापडले महिलेचं छिन्नविछिन्न अवस्थेत शीर, पोलिसांकडून धडाचा शोध सुरू
दिवसेंदिवस माणसामधील संवेदनशीलता नष्ट होत आहे, ही बाब कोलकातातील एका घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. कोलकाता येथील गोल्ड ग्रीन परिसरात कचरा वेचणाऱ्या वाहनात एका महिलेचे छिन्नविछिन्न शीर दिसल्याने खळबळ उडाली होती. मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचे छिन्नविछिन्न अवस्थेत शीर पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचे छिन्नविछिन्न शीर सोबत घेतले. मात्र या महिलेचा मृतदेह किंवा तिच्या शरीराचे अवयव जवळपास कुठेही सापडले नसल्याची शक्यता पोलिस व्यक्त केली आहे. यानंतर अशा जघन्य गुन्ह्यामागे जबाबदार असलेल्यांचा शोध घेतला जाईल. स्थानिक लोकांना महिलेची ओळख पटू शकली नाही. तपास अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. कोलकाता पोलिस उपायुक्त बिदिशा कलिता घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, गजबजलेल्या परिसरात महिलेचे छिन्नविछिन्न शीर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्रीच्या वेळी कोलकात्याच्या दक्षिणेकडील सीमेवर असलेल्या ठाकूरपुकुरमध्ये एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून गोणीत गुंडाळलेल्या माणसाचा कुजलेला मृतदेह सापडला. या प्रकरणातही मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणात मयत इकडे-तिकडे फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा.
तर दूसरीकडे एक महिला पहाटे अकरावीच्या वर्गातल्या मुलाला शाळेत जाण्यासाठी उठवण्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये गेली तेव्हा तिला माहित नव्हते की हा मुलगा तिच्या मृत्यूचे कारण बनणार आहे. 3 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये आरती देवी वर्मा या महिलेने आपला 17 वर्षांचा मुलगा अमनला शाळेत जाण्यासाठी उठण्यास सांगितले. पण अमनला शाळेत जावंसं वाटत नव्हतं. उठायला सांगितल्यावर तो संतापला आणि त्याने आईला जमिनीवर ढकलले. यामुळे आरती देवीचे डोके भिंतीवर जोरात आदळले. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
आईची हत्या केल्यानंतर अमनने सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडले. घराला बाहेरून कुलूप लावून चार दिवस मृतदेह घरातच ठेवला. आरती देवीच्या अंगाला कुजून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा तिने अगरबत्ती जाळण्यास सुरुवात केली. पाचव्या दिवशी अमन घरातून बाहेर आला आणि जवळच्या मंदिरात जाऊन बसला.