(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दरम्यान यावेळी एक खळबळजनक प्रसंग घडला. डोनाल्ड ट्रम्प यांनी बैठीमध्ये व्लादिमिर पुतिन यांना एक पत्र दिले. हे पत्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी लिहिलेले होते. या प्रसंगाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून या पत्रामध्ये नेमकं काय लिहिले असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यामध्ये युक्रेन युद्धात रशियाने मुलांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.
आधी थप्पड मग मारली बाटली…; पाकिस्तानमध्ये श्वानासोबत अमानवीय कृत्य, VIDEO VIRAL
या पत्रातील सर्व तपशील उघड करण्यात आलेले नाहीत. परंत या पत्रामध्ये युक्रेन आणि रशियामधील युद्धादरम्यान (Russia Ukraine War) मृत पावलेल्या, जखमी झालेल्या आणि अपहरण झालेल्या मुलांच्या परिस्थितीचा त्यांनी उल्लेख केला आहे. युक्रेनने आरोप केला आहे की त्यांच्या देशातील मुलांचे अपहरण करण्यात आले असून त्यांना रशियन प्रदेशामध्ये नेण्यात आआले आहे.
मेलानिया यांनी याला युद्ध गुन्हा म्हणून वर्णन केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या कायद्यानुसार, रशियाची ही कृती नरसंहारच्या वर्गात येते असे मेलानिया यांनी म्हटले आहे. रशियावर संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनांनी देखील २०२२ मध्ये सुरु झालेल्या युद्धात आतापर्यंत रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
या बैठीवेळीच तिकडे युक्रेनमध्ये रशियन सैन्याने कहर माजवला आहे. यक्रेनच्या दोन गावांवर रशियाने नियंत्रण मिळवले आहे. तसेच बॅलेस्टिक क्षेत्रणास्त्र आणि ड्रोन हल्लाही केला आहे. युक्रेनच्या डोनेस्टक भागातील कोलोडियाजी आणि निप्रोपेट्रोव्स्कमधील वोरोन गावावर नियंत्रण मिळवले आहे.
दरम्यान अलास्कामधील बैठकीपूर्वी युक्रेन अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी एक मोठे विधान केले होते. त्यांनी रशियाचा युद्धबंदीचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले होते.
ट्रम्प आणि पुतिनच्या बैठकीचा उद्देश रशिया युक्रेन युद्ध थांबवणे होता. पण या बैठकीत कोणताही ठोस निर्णय किंवा शांतता करार झाला नाही. या बैठकीनंतर ट्रम्प झेलेन्स्कींची भेट घेणार आहेत. सोमवारी (१८ ऑगस्ट) रोजी ही भेट होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी आता रशिया युक्रेन युद्ध संपवणे हे झेलेन्स्कींवर अवलंबून असल्याचे म्हटले.
Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ






