Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जत पळसदरी महामार्ग रस्त्याच्या कडेला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता

शहापूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्गावर कर्जत खोपोली भागातील निर्मनुष्य भागात मृतदेह आढळून आला आहे. पळसदरी भागात मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने पुढे नेली आहेत.

  • By विवेक
Updated On: May 30, 2026 | 08:02 PM
Women dead body found at Karjat Palasdari road, Crime, Karjat news, Crime News,

Women dead body found at Karjat Palasdari road, Crime, Karjat news, Crime News,

Follow Us
Follow Us:

कर्जत,ता.30 प्रतिनिधी: शहापूर मुरबाड कर्जत खोपोली या राष्ट्रीय महामार्गावर कर्जत खोपोली भागातील निर्मनुष्य भागात मृतदेह आढळून आला आहे. पळसदरी भागात मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने पुढे नेली आहेत. दरम्यान या घटनेने या भागात पुन्हा एकदा मृतदेह आढळण्याची परंपरा पुढे सुरू राहिली असून घातपाताचा शक्यता असल्याने पोलिसांकडून तपासाला वेग आणला आहे.

कर्जत-खोपोली महामार्गावरील पळसदरी ते तळवली गावादरम्यान रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात अंदाजे 35 ते 40 वर्षीय अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सदर घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पळसदरी-तळवली मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातून गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले.मात्र दुर्गंधी वाढल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे एका महिलेचा मृतदेह पडलेला असल्याचे लक्षात आले. यानंतर तात्काळ कर्जत पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.ही माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद रोकडे, हवालदार लालास तोरवे तसेच त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यू नेमका कधी झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या प्रकरणातील गूढ उकलण्यास मदत होणार आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात मृत्यूची नोंद करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.मात्र प्राथमिक अंदाजानुसार संबंधित महिलेचा मृत्यू सुमारे पाच दिवसांपूर्वी झाला असावा असे सांगितले जात आहे.

Chandrapur Crime: आईच बनली सौदागर? चंद्रपुरात दोन मुलांची विक्री केल्याचा आरोप, नवजात बाळालाही विकण्याचा प्रयत्न उघड

त्या मृत महिलेचे अंगावर कुर्ती आणि निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली होती. तिच्या उजव्या हातात एक बांगडी आढळून आली आहे. मात्र मृतदेह कुजल्याने त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. पोलिसांनी मृतदेहावरील कपडे, दागिने आणि इतर बाबींची नोंद घेतली असून परिसरातील तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता महिलांच्या नोंदींची पडताळणी सुरू केली आहे. संबंधित महिलेचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला की ती एखाद्या अपघाताची बळी ठरली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तसेच तिची हत्या करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकण्यात आला असण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. याशिवाय तिच्यासोबत कोणताही गैरप्रकार झाला आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे. दरम्यान, महामार्गालगत अशा अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने पळसदरी, तळवली तसेच परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेची ओळख पटवून तिच्या मृत्यूमागील सत्य शोधण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून सध्या त्या मृतदेहाबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

‘मी भाई आहे’ म्हणत वाईन शॉपबाहेर धिंगाणा, काचेच्या बाटल्यांनी तरुणावर हल्ला; नेमकं काय घडलं?

Web Title: Women dead body found at karjat palasdari road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • crime news
  • Crime Police
  • karjat news

संबंधित बातम्या

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
1

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
2

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
3

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
4

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.