Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhagwant Mann : मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवास्थानावर दिल्ली पोलिसांची छापेमारी

निवडणूक आयोगाचं पथक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थान असलेल्या कपूरथला हाऊसमध्ये झडती घेण्यासाठी पोहोचलं आहे. भाजप नेत्यांने तक्रारप तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 30, 2025 | 07:33 PM
मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवास्थानावर दिल्ली पोलिसांची छापेमारी

मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवास्थानावर दिल्ली पोलिसांची छापेमारी

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान काही दिवसांवर आलं असताना निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाचे पथक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थान असलेल्या कपूरथला हाऊसमध्ये झडती घेण्यासाठी पोहोचलं आहे. भाजप नेत्यांने तक्रारप तक्रारीवरून ही कारवाई करण्यात येत आहे. पंजाबमधून मोठ्या प्रमाणात दिल्लीत पैसे आणि दारू आणली जात आहे आणि कपूरथळा हाऊसमध्ये लपवली जात असल्याचा आरोप केला होता.

असे सांगितले जात आहे की निवडणूक आयोगाचा एक अधिकारी दिल्ली पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह कपूरथळा हाऊसच्या बाहेर उभा आहे. मात्र आत जाण्याची परवानगी नाही. पंजाब पोलिसांचे अधिकारी पंजाब पोलिसांच्या डीआयजींशी आत जाण्याच्या परवानगीबाबत चर्चा करत आहेत.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगासह जिल्हा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी उपस्थित आहे. आरओ आणि एफएसटीच्या तक्रारीवरून ही कारवाई केली जात आहे. एफएसटीच्या सुरक्षेसाठी पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणात रिटर्निंग ऑफिसर आणि एसडीएम चाणक्यपुरी ओपी पांडे यांनीही निवेदन दिले आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, आम्हाला निवडणूक आयोगाच्या cVIGIL पोर्टलवर तक्रार मिळाली आहे की कपूरथळा हाऊसमधून पैसे वाटले जात आहेत, म्हणूनच आम्ही आलो आहोत. आम्हाला १०० मिनिटांच्या आत तक्रार निकाली काढावी लागेल. आतून परवानगी मागितली आहे. आमची टीम ४ वाजता दाखल झाली आहे, १०० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला आहे मात्र आत प्रवेश नाकारण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या टीमला काम करू दिले जात नसल्याची तक्रार आम्ही एसएचओकडे केली आहे. आम्ही अजूनही आत जाण्याची वाट पाहात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाच कृत्य निषेधार्ह : भगवंत मान

या संपूर्ण प्रकरणात भगवंत मान म्हणाले की, आज निवडणूक आयोगाचे पथक दिल्ली पोलिसांसह कपूरथळा हाऊसवर छापा टाकण्यासाठी दिल्लीतील माझ्या घरी पोहोचलं आहे. भाजपचे लोक दिल्लीत उघडपणे पैसे वाटत आहेत पण दिल्ली पोलिस आणि निवडणूक आयोगाला काहीही दिसत नाही. या सगळ्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. एक प्रकारे, दिल्ली पोलिस आणि निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर पंजाबी लोकांना बदनाम करत आहेत, जे अत्यंत निषेधार्ह आहे.

मुख्यमंत्री आतिशी यांचा भाजपवर हल्लाबोल

कपूरथळा हाऊस येथे निवडणूक आयोगाच्या पथकाच्या कारवाईवरून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आतिशी म्हणाल्या, दिल्ली पोलिस भगवंत मान यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकण्यासाठी पोहोचले आहेत. भाजपचे लोक दिवसाढवळ्या पैसे, बूट आणि चादरी वाटत आहेत, पण ते दिसत नाही. त्याऐवजी ते निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापा टाकायला जातात. वाह भाजप! दिल्लीचे लोक ५ तारखेला याचं उत्तर देतील.

या प्रकरणाबाबत, आम आदमी पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट पोस्ट केली आहे. यामध्ये भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. पक्षाने म्हटले आहे की, भाजप पराभवाच्या भीतीने थरथर कापत आहे. भाजपचे दिल्ली पोलिस पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीतील घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले आहेत. भाजपचे लोक दिवसाढवळ्या पैसे, बूट, चादरी वाटत आहेत, पण पोलिस आणि निवडणूक भाजपने आयोगाच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे.

 

Web Title: Election commission and delhi police raid on punjab cm bhagwant mann kapurthala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • Bhagwant Mann
  • Delhi Assembly election 2025
  • Delhi Election 2025
  • Delhi Elections
  • Delhi Police

संबंधित बातम्या

New Delhi Hit and Run: दिल्लीतील चाणक्यपुरीत हिट अँड रन: 26 वर्षीय तरूणाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले
1

New Delhi Hit and Run: दिल्लीतील चाणक्यपुरीत हिट अँड रन: 26 वर्षीय तरूणाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले

Delhi Crime : दुहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली; तरुणी आणि ६ महिन्यांच्या मुलाला चाकूने भोसकलं
2

Delhi Crime : दुहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली; तरुणी आणि ६ महिन्यांच्या मुलाला चाकूने भोसकलं

Delhi Crime : सोशल मीडिया प्रेमात विष कालवतोय! दिल्लीतील ३ तरुणींचा घेतला बळी, जोडीदारांनीच संपवलं
3

Delhi Crime : सोशल मीडिया प्रेमात विष कालवतोय! दिल्लीतील ३ तरुणींचा घेतला बळी, जोडीदारांनीच संपवलं

नजर चुकवून एटीएममध्ये कार्ड अदलाबदल करून करायचे फसवणूक; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
4

नजर चुकवून एटीएममध्ये कार्ड अदलाबदल करून करायचे फसवणूक; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.