फोटो - सोशल मिडिया
हरयाणा विधानसभेचे निकाल आज जाहीर होत आहेत. मतमोजणी सुरू आहे. दरम्यान कुस्तीपटू विनेश फोगाट या यंदा राजकरणाच्या मैदानात उतरल्या होत्या. हरयाणाच्या जुलाना मतदारसंघातून त्या कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार होत्या. विनेश फोगाट यांनी भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला आहे. रियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विनेश फोगट विजयी झाल्या आहेत. त्यांना भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांच्याशी कडवी टक्कर होती. फोगट सुरुवातीला कॅप्टन बैरागी यांच्यापेक्षा मागे होते, पण शेवटी ५,७६१ मतांनी विजयी झाल्या आहेत.
हरयाणामध्ये आज मतमोजणी सुरू आहे. हरियाणात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज काही तासांत लागणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी उत्साही झालेल्या काँग्रेसला राज्यात १० वर्षांनंतर सरकार स्थापन करण्याचा विश्वास आहे. त्याचवेळी भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. नवीन सरकारसाठी ५ तारखेला मतदान झाले. लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातील पहिली मोठी थेट लढत आहे.
हरियाणामध्ये ६५.६५ टक्के मतदान झाले
यावेळी हरियाणा विधानसभा निवडणुकीत ६५.६५ टक्के मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी खूपच कमी होती. २०१४ मध्ये ६८ टक्के मतदान झाले होते. हरियाणातील ९० जागांपैकी काँग्रेसने ८९ जागांवर तर भाजपने ८९ जागांवर उमेदवार उभे केले होते. यावेळी आझाद समाज पक्ष आणि जननायक जनता पक्षाने युती करून निवडणूक लढवली होती.INLD ने बहुजन समाज पक्षासोबत युती केली होती. येथील सर्व जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी निवडणूक झाली होती.
दोन महिन्यांपूर्वी ऑलिंपिक स्पर्धेत विनेश फोगाटचे पदक हुकले होते. काही ग्रॅम वजन जास्त भरत असल्याने तिला अंतिम सामना खेळता आला नव्हता. त्यामुळे तिचे सुवर्ण पदक थोडक्यात चुकले. त्यानंतर त्यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. अखेर विनेश फोगाट विजयी झाल्या आहेत.