Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर; १८ जूनला मतदान

Vidhan Parishad Election 2026 : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे या मतदारसंघांतील आमदारांचा कार्यकाळ संपल्यानंतरही नव्या निवडणुका घेता आल्या नव्हत्या.

  • By anuradha sagar
Updated On: May 18, 2026 | 12:28 PM
नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम

नागपुरात बंड थोपवण्यात भाजपला अपयश; पुण्यातून चिवटेंची माघार पण अनिल सोले लढण्यावर ठाम

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
  • राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या
  • निवडणुकीसाठी २५ मे रोजी अधिसूचना जारी होणार असून, १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान, तर २२ जून रोजी अंतिम मतमोजणी
 

Vidhan Parishad Election 2026: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेतील सदस्यसंख्या वाढणार असल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

अडीच वर्षांपासून जागा रिक्त

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे या मतदारसंघांतील आमदारांचा कार्यकाळ संपल्यानंतरही नव्या निवडणुका घेता आल्या नव्हत्या. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून अनेक जागा रिक्त होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या किमान ७५ टक्के मतदार उपलब्ध असल्यास विधान परिषद निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्यांपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात.

Maharashtra Breaking News Updates Today: नीट पेपरफुटी प्रकरण: ‘RCC’चे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

निवडणुकीचा कार्यक्रम

अधिसूचना जाहीर : २५ मे

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख : १ जून

अर्ज छाननी : २ जून

अर्ज माघारीची अंतिम मुदत : ४ जून

मतदान : १८ जून (सकाळी ८ ते दुपारी ४)

मतमोजणी : २२ जून

या मतदारसंघांमध्ये होणार निवडणूक

सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली-संभाजीनगर, जिल्ह्य़ा-जिल्ह्यातील गडचिरोली  आणि नागपूर  या मतदारसंघांचा समावेश आहे.

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक

 

विधान परिषदेत सदस्य कसे निवडले जातात?

राज्य विधानपरिषदेत  एकूण सदस्यसंख्या ७८ आहे. त्यापैकी:

– ३० सदस्य आमदारांकडून निवडले जातात

– २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून

– ७ सदस्य पदवीधर मतदारसंघातून

– ७ सदस्य शिक्षक मतदारसंघातून

– १२ सदस्य राज्यपाल नियुक्त करतात

विधानसभेतील सध्याचे संख्याबळ

भारतीय जनता पक्ष – १३१
शिवसेना शिंदे गट – ५७
राष्ट्रवादी काँग्रेस – ४०
राष्ट्रीय काँग्रेस – १६
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – १०
शिवसेना ठाकरे गट– २०

याशिवाय इतर लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. सध्या महायुतीकडे २३४ आमदारांचे संख्याबळ असून महाविकास आघाडीकडे ४९ आमदार आहेत.

 

Web Title: Election announced for 17 seats of the maharashtra legislative council on june 18

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council Election
  • Maharashtra Politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

Karjat News : पंतप्रधान मोदींच्या कर्जत दौऱ्याची चर्चा; संभाव्य कार्यक्रमासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग
1

Karjat News : पंतप्रधान मोदींच्या कर्जत दौऱ्याची चर्चा; संभाव्य कार्यक्रमासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग

Matheran News : मिनीबस चालकाची ज्येष्ठ नागरिकांशी अरेरावी; माथेरानच्या प्रवासात प्रवाशांचा संताप
2

Matheran News : मिनीबस चालकाची ज्येष्ठ नागरिकांशी अरेरावी; माथेरानच्या प्रवासात प्रवाशांचा संताप

Middle East : सौदीच्या मदतीला धावला इजिप्त ;हुथींच्या हल्यांमुळे सौदी बेजार
3

Middle East : सौदीच्या मदतीला धावला इजिप्त ;हुथींच्या हल्यांमुळे सौदी बेजार

World Economy : विकसनशील देशावर कर्जाचा ताण ;जागतिक बँकेच्या बैठकीत उपायांचा अभाव
4

World Economy : विकसनशील देशावर कर्जाचा ताण ;जागतिक बँकेच्या बैठकीत उपायांचा अभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.