File Photo : Vinesh-Phogat
चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान नुकतेच पार पडले. आता या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठपासून सुरु झाली आहे. असे असताना यामध्ये सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आघाडीवर दिसत होते. इतकेच नाहीतर काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केल्याचेही ट्रेंडमध्ये दिसून आले होते. काँग्रेस आता येथे निर्णायक आघाडी घेत असल्याचे दिसत आहे. विनेश फोगट 4130 मतांनी पुढे आहेत. 15 पैकी 9 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. काँग्रेसला येथे आतापर्यंत 41182 मते मिळाली आहेत. तर योगेश कुमार ३७०५२ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत
हेदेखील वाचा : Haryana Election Results 2024 : लालू यादव यांचे जावई रेवाडीत पिछाडीवर; मुख्यमंत्री सैनी-हुडा आघाडीवर
हरियाणातील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 90 जागांचे निकाल आता समोर येत आहेत. आधी काँग्रेसने आघाडी घेतली, आता भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. एकंदरीत हरियाणात कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी, भूपिंदर सिंग हुडा, विनेश फोगट, रणजित सिंह चौटाला, दुष्यंत चौटाला, गोपाल कांडा आणि सावित्री जिंदाल यांच्यासह अनेक मोठे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अंबाला कँटमध्ये अपक्ष उमेदवार चित्रा सरवरा आघाडीवर आहेत. अनिल विज त्यांच्यापेक्षा 940 मतांनी पिछाडीवर आहेत.
दरम्यान, हिसार मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या सावित्री जिंदाल आघाडीवर आहेत. जुलाना मतदारसंघातून विनेश फोगट दोन हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. या जागेवर भाजपचे उमेदवार योगेश बैरागी यांनी आघाडी घेतली आहे. तर कर्नालमधून भाजपचे उमेदवार जगमोहन आनंद 4479 मतांनी आघाडीवर आहेत. हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भान त्यांच्या होडल जागेवर 637 मतांनी आघाडीवर आहेत.
हेदेखील वाचा : पाकिस्तानमध्ये अचानक झाकीर नाईकने भारताची केली वाह वाह आणि मग… पाहा व्हायरल व्हिडिओ