जम्मू काश्मीर-हरयाणा विधानसभेचे निकाल (फोटो - टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीससाठी एकूण तीन टप्प्यांमध्ये मतदान पार पडले आहे. त्याचप्रमाणे हरयाणामध्ये देखील मतदानाचे संपूर्ण टप्पे पार पडले आहेत. दरम्यान आता उद्या जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभेचे निकाल जाहीर होणार आहेत. दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र निकालाआधी समोर आलेल्या एक्झिट पोलने अनेक पक्षांची झोप उडवली आहे. उदय सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दोन्ही राज्यांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने कलम ३७० हटविल्यानंतर प्रथमच निवडणूक झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये ९० जागांसाठी मतदान पार पडले आहे. यंदाची निवडणूक जम्मू काशमरीसाठी महत्वाची मानली जात आहे. २०१९ मध्ये कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू काश्मीरची ही पहिलीच निवडणूक आहे. या ठिकाणी कॉँग्रेस आणि नॅशनल कॉँग्रेस पक्षाने एकत्रितपणे निवडणूक लढवली आहे. तर पीपल्स डेमोक्रेटिक आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे.
तर दुसरीकडे हरयाणामध्ये ९० जागांसाठी ५ तारखेला मतदान पार पडले होते. हरयाणामध्ये भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉँग्रेस यांच्यात महत्वाची लढत होणार आहे. त्यामुळे हरयाणामध्ये देखील समोर आलेल्या एक्झिट पोलने अनेक पक्षांची झोप उडवली आहे. त्यामुळे हरयाणामध्ये भाजप सत्ता राखणार की नवीन सरकार येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
जम्मू काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून दोन्ही राज्यांच्या निवडणुकीच्या मतदान मोजणीस सुरूवात होणार आहे, सुरुवातीला पोस्टल बॅलेट मंतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीस सुरूवात होणार आहे. साधारणतः दुपारी तीन ते ५ वाजण्याच्या सुमारास दोन्ही राज्यात कोणाचे सरकार येणार याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
काय आहेत हरयाणाच एक्झिट पोल्स?
एक्झिट पोल ( Exit Polls)
दैनिक भास्कर – कॉंग्रेस 44 ते 54 जागा, भाजप 15-29, जेजेपी 0-1, आप 0-1 आणि इतर 4-9
पिपल्स पल्स- कॉंग्रेस 49-61, भाजप 20-32, जेजेपी 0-1, आप 2-3 आणि इतर 3-5
ध्रुव रिर्सच- कॉंग्रेस 50-64, भाजप 22-32, जेजेपी 0, आप 0 आणि इतर 2-8
पी मार्क ( P Marq)- कॉंग्रेस 51-61, भाजप 27-35, जेजेपी 0, आप 3-6 आणि इतर 0