महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी नेत्यांनी केले देव दर्शन घेतले आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. राज्यामध्ये 65.11 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे सर्व नेत्यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. आता अनेक नेते देवदर्शनाला गेले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मागील दीड महिन्यापासून प्रचार सुरु होता. अहोरात्र नेते प्रचारामध्ये दंग होते. त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. निकालामध्ये व मतदानामध्ये तीन दिवसांचा फरक असल्यामुळे आता नेत्यांनी देवदर्शन घेतले आहे. निकालापूर्वी एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे तिरुपती बालाजीला गेले आहेत. श्रीकांत शिंदे यांनी बालाजीचे दर्शन घेत प्रार्थना केली. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे प्रतिष्ठेची बनली आहे.
#WATCH | Tirumala, Andhra Pradesh: Shiv Sena MP Srikant Shinde offered prayers at the Tirumala Sri Venkateswara Temple pic.twitter.com/7QH4y1l8wu
— ANI (@ANI) November 22, 2024
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
श्रीकांत शिंदे यांच्यासह आता भाजप नेत्या व राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी देखील तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. रक्षा खडसे यांनी आपल्या परिवारासह तिरुपती बालाजी दर्शन घेतले आहे. सोशल मीडियावर याची व्हिडिओ देखील समोर आली आहे. यामुळे आता निकालाच्यापूर्वी नेत्यांनी देवदर्शन घेतले आहे. आता देव कोणाला पावणार याची उत्सुकता सर्व नेत्यांना लागली आहे. उद्या (दि.23) विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे.
#WATCH | Tirumala, Andhra Pradesh: Union Minister Raksha Khadse visited the Tirumala Sri Venkateswara Temple pic.twitter.com/W58i97lfoS
— ANI (@ANI) November 22, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीनंतर आता नेत्यांनी परिवारासोबत वेळ घालवण्यास सुरुवात केली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप हे देखील मतदानानंतर पत्नीसह फिरायला गेले आहेत.त्यांनी सोशल मीडियावर याचे फोटो शेअर करत परिवारासोबत आनंदाचे क्षण घालवल्याचे सांगितले.